25N96833
पावस ः कलासादर करताना माऊली महिला नमन मंडळाचे कलाकार
महिलांचे शिवधनुष्य : नमनकलेतून तेजस्वी वाटचाल
रत्नागिरी, मुंबईत वर्षभरात ‘माऊली’चे २१ प्रयोग सादर ; कला जपण्याचा प्रयत्न
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. ६ ः प्रत्येक क्षेत्रात महिलांनी सहभागी होऊन आपले कर्तृत्व सिद्ध करायला हवे आणि ते करण्यासाठी प्रयत्नही करायला हवेत. त्यामुळे यश मिळते, हे सिद्ध करण्यासाठी आडिवरे राजापूर येथे नवरात्रोत्सवात महाकाली मंदिरात पहिला प्रयोग सादर करणाऱ्या आभार संस्था संचलित माऊली महिला नमन मंडळाने आतापर्यंत रत्नागिरी ते मुंबई असे वर्षभरात २१ नमन प्रयोग सादर केले.
रत्नागिरी जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्र राज्यातील महिलांनीच सादर केलेले हे नमन म्हणजे कलाकारांनी उचलेले शिवधनुष्यच म्हणावे लागेल. कोकणातील या कलेला प्रोत्साहन द्यावे यासाठी महिलांचे व्यासपीठ उभे करावे, या हेतूने माऊली महिला नमन मंडळाची स्थापना झाली. नमनकलेमध्ये अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख असलेले नमनसम्राट यशवंत वाकडे यांनी नमन सरावाला सुरुवात केली. सर्व कलाकारांकडून चांगला प्रतिसाद मिळू लागला. २०२४ मध्ये नवरात्रोत्सवात आडिवरे येथील महाकाली मंदिर येथे प्रयोगाची मुहूर्तमेढ रोवली गेली. वर्षभरात या प्रयोगाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळू लागला. दादर येथील शिवाजी मंदिर, रत्नागिरीतील सावरकर नाट्यगृह अशा विविध ठिकाणी या मंडळाने प्रयोग केले. त्यामुळे महिला कलाकारांमध्ये ऊर्जा निर्माण झाली आहे. या नमनाचे निर्माता साईनाथ नागवेकर, लेखक व दिग्दर्शक नमनसम्राट यशवंत वाकडे, सागर मायगडे, वासुदेव वाघे, नेपथ्य बावा आग्रे यांनी या नमनामध्ये रंगत आणण्यावर भर दिला आहे. शरद गोळपकर, दादा वाडेकर, मदन डोर्लेकर, राकेश बेर्डे, प्रवीण सावंतदेसाई, संजय मेस्री, मानसी साळवी, विशाखा चव्हाण यांनीही विशेष मेहनत घेतली आहे. यातील सर्व गीते सर्वता चव्हाण यांनी लिहिलेली असून, या गाण्याला खरी रंगत आणली आहे ती मुख्य गायिका आकांक्षा वायंगणकर यांनी. त्यांना वेदा शेट्ये यांची साथ मिळाली आहे. ढोलकीपटू पार्तेज आंबेरकर, परशुराम घवाळी, साई घवाळी यांनी रंगत आणली आहे.
चौकट
नमनामधील महिला कलाकार
नमनामध्ये प्रेरणा विलणकर, समीक्षा वालम, अर्चना मयेकर, वेदा शेट्ये, शीतल सकपाळ, रिमा देसाई, विनया काळप, पूनम गोळपकर, रेश्मा शिदे, वीणा भागवत, आकांक्षा वायंगणकर, तन्वी नागवेकर, सर्वता चव्हाण, रेखा खातू, ज्योती कदम, माधवी पाटील, पूर्वा चव्हाण, शमिका विलणकर, जुही पावसकर, शोभना वडपकर, मनस्वी साळवी, स्वीटी पावसकर, निधी वडपकर या महिला कलाकार काम करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.