कोकण

''नो पार्किंग''चे फलक तरीहीसुध्दा ''पार्किंग''

CD

swt610.jpg
96807
बांदाः येथे पोलीसांना निवेदन देताना भाजपचे पदाधिकारी.

‘नो पार्किंग’चा फलक फक्त नावालाच
बांदा श्रीराम चौकात वाहतूक कोडी; भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे पोलिसांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १०ः श्रीराम चौकातील उड्डाणपुलाखालील दोन्ही बाजूंना वाहनधारकांनी मनमानी पद्धतीने वाहने उभी केल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. यामुळे समोरून येणारी वाहने दिसत नसल्याने किरकोळ अपघातांची मालिका सुरू असून, जेष्ठ नागरिक, महिला, शाळकरी मुले तसेच आजूबाजूच्या गावांतून बांदा शहरात येणाऱ्या नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
या समस्येबाबत नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्यानंतर बांदा ग्रामपंचायतीने ग्रामसभेतील ठरावानुसार श्रीराम चौकात ‘नो पार्किंग’चे फलक लावले आहेत. मात्र, काही वाहनधारक या नियमांकडे दुर्लक्ष करत असल्याने वाहतुकीचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. याबाबत बांदा भाजपतर्फे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात चौकातील अवैधरित्या उभी असलेली वाहने तात्काळ हटविणे व संबंधित वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच भविष्यात अपघात होऊन प्राणहानी झाली तर त्यातून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, हेही निवेदनात नमूद करण्यात आले.
निवेदनावर प्रतिक्रिया देताना श्री. पालवे यांनी श्रीराम चौक हा वाहतुकीसाठी संपूर्णपणे खुला ठेवण्यात येईल, तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले. या प्रसंगी पोलिस उपनिरीक्षक शिवराज झांजुर्णे यांनीही वाहतुकीच्या सुरळीततेसाठी आवश्यक पावले उचलली जातील, असे सांगितले. नागरिकांनी शिस्त राखून पोलिस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी भाजप बांदा मंडल उपाध्यक्ष गुरु कल्याणकर, शहर अध्यक्ष बाबा (नरसिंह) काणेकर, ग्रामपंचायत सदस्य रत्नाकर आगलावे, प्रशांत बांदेकर, मंडल सदस्य संदीप बांदेकर, बूथ अध्यक्ष राकेश केसरकर, शैलेश केसरकर, दर्पण आळवे आदी उपस्थित होते.

चौकट
कडक कारवाई होणार
झाराप झिरो-पॉईंट येथे घडलेल्या अपघाताप्रमाणे बांदा परिसरात असा प्रसंग घडू नये म्हणून सर्व शाळा-कॉलेजांना वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत सक्त ताकीद देण्यात येईल. तसे न केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. कोणत्याही प्रकारचे बेशिस्त वर्तन किंवा वाहतुकीत अडथळा निर्माण करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक पालवे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जगातला सगळ्यात मोठा डॉन; 'मुळशी पॅटर्न'प्रमाणेच बकासूर झाला अन् अमेरिकेच्या जेलमध्ये तडफडून मेला

Lawyer Rakesh Kishor: मोठी बातमी! सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलावर कारवाई; बार कौन्सिलने घेतला मोठा निर्णय

Latest Marathi News Live Update : खासदर शोभाताई बच्छाव यांचा पाचोरा तालुक्यातील पाहणी दौरा पूर्ण

Akola News : आरक्षण जाहीर! कुठे धक्का तर कुठे मिळाली संधी; जिल्ह्यातील पाच नगराध्यक्ष पदांवर महिलाराज

Kannad Nagarparishad Election : कन्नड नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलांसाठी राखीव; शहरात ‘भावी वहिनीसाहेब’ ताईसाहेब चर्चेत

SCROLL FOR NEXT