कोकण

शेनाळे घाटातील धोकादायक ‘यु टर्न’वर अपघात

CD

- rat६p२८..jpg-
२५N९६९४३
मंडणगड ः शेनाळे घाटातील त्या अवघड वळणावर अपघातग्रस्त झालेली मोटार.
----------
शेनाळे घाटातील ‘ते’ वळण चर्चेत
रुंदीकरणाकडे महामार्ग प्राधिकरणाचे दुर्लक्ष ; नागरिक संतप्त
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. ७ ः आंबडवे-महाड-राजेवाडी महामार्गावरील शेनाळे घाटातील चिंचाळी धरणाजवळील तीव्र वळण धोक्याचे ठरत असून, ५ ऑक्टोबरला या ठिकाणी झालेल्या गंभीर अपघाताने पुन्हा एकदा या प्रश्नाकडे लक्ष वेधले आहे. अपघातग्रस्त मोटार रस्त्यालगतच्या बॅरिकेडस् ला आदळल्याने चालक आणि प्रवासी बचावले.
स्थानिक नागरिक आणि प्रवासी यांनी या वळणाबाबत महामार्ग प्राधिकरणाला वारंवार सूचना देऊनही काहीही सुधारणा करण्यात आलेली नसल्याने प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे. अपघातानंतरही प्राधिकरणाला धडा न मिळाल्यास एखाद्या गंभीर जीवितहानीनंतरच उपाययोजना होतील का? असा संतप्त सवाल नागरिकांकडून केला जात आहे. आंबडवे राजेवाडी मार्गाचे नूतनीकरण आणि काँक्रिटीकरणाचे काम सध्या सुरू असून, पाच मीटर रुंदीच्या जुन्या डांबरी रस्त्याऐवजी आता दहा मीटर रुंदीचा काँक्रिट रस्ता बनवला जात आहे; मात्र शेनाळे घाटात, विशेषतः चिंचाळी धरणाजवळील मोठे वळण, प्राधिकरणाने नियोजनबद्ध रितीने रुंद न केल्याने ते तसे अरुंदच राहिले आहे. अपघातानंतर नागरिकांनी आणि वाहनचालकांनी प्राधिकरणाला तातडीने या वळणावर रुंदीकरण करून वळणाची तीव्रता कमी करण्याची मागणी केली आहे.
---
कोट १
शेनाळे चिंचाळी घाटातील या वळणावर एकावेळी दोन वाहनांना जाणे फार कठीण जाते. अनोळखी वाहनचालकांना वळणाच्या अरुंदपणाचा अंदाज येत नाही, त्यामुळे अपघाताची शक्यता कायम असते. या ठिकाणी तातडीने रुंदीकरण करून वळणाची तीव्रता कमी करणे गरजेचे आहे.
- कौस्तुभ भिंगार्डे, मंडणगड.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navi Mumbai Airport and Pune citizens benefit : नवी मुंबई विमानतळ सुरू झाल्याने पुणेकरांचाही होणार मोठा फायदा, जाणून घ्या कसा?

Latest Marathi News Live Update : भाईंदरमध्ये मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

डोक्यात फरक झालाय का? उर्दूसोबत झोपतो म्हणल्यावर नेटकऱ्यांचीही सटकली; सचिन पिळगावकर पुन्हा ट्रोल; असं काय म्हणाले?

Raigad News: पर्यटन हंगामाचा शुभारंभ! जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी खुला; दिवाळीसाठी सज्ज

Divorce Celebration Viral Video : दुग्धाभिषेकाने मराठमोळ्या भिडूनं साजरा केला घटस्फोट! १२ तोळ सोनं-१८ लाख रुपये रोख देऊन सुटका...

SCROLL FOR NEXT