कोकण

भक्तिमय संगीत मैफलीने सावंतवाडीवासीय मंत्रमुग्ध

CD

97283

भक्तिमय संगीत मैफलीने
सावंतवाडीवासीय मंत्रमुग्ध
सावंतवाडी ः श्री टेंब्ये स्वामींच्या वास्तव्याने पावन झालेल्या येथील श्री एकमुखी दत्त मंदिर येथे कोजागरी पौर्णिमेच्या मंगलमय रात्री सुरेल गीत गायन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. खासकीलवाडा आणि सबनिसवाडा येथील रहिवाशांनी एकत्र येऊन पहिल्यांदाच या कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन केले. ​यावेळी श्री दत्त क्षेत्र माणगाव येथील योगेश सावंत-भोसले (एम.ए. म्युझिक, पं. सुरेश वाडकर यांचे शिष्य) यांनी मधुर गायनाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. रात्री साडेनऊला सुरू झालेल्या या कार्यक्रमाला सावंतवाडीतील अनेक संगीतप्रेमींनी उपस्थिती दर्शवत उत्स्फूर्त दाद दिली. ​तबला साथ पप्पू तामाणेकर (एम.ए. तबला विशारद) आणि ज्यस्मित पिळणकर यांनी केली. समर्थ केळुसकर (विशारद) यांनी हार्मोनियम आणि कमलाकर कळंगुटकर यांनी झांज वाजवून कार्यक्रमात रंगत आणली. ​कार्यक्रमाच्या समाप्तीनंतर कोजागरी पौर्णिमेची परंपरा जपत उपस्थितांसाठी दूध आणि भेळ वाटप केले. या आगळ्यावेगळ्या आणि भक्तिमय संगीत सोहळ्याने दत्त मंदिरातील कोजागरीची रात्र अविस्मरणीय आणि संगीतमय झाली.
---
97286
भालाफेक स्पर्धेत श्रीओम तृतीय
आरोंदा ः महात्मा गांधी विद्यामंदिर सातार्डा या प्रशालेतील विद्यार्थी श्रीओम आसोलकर याने तालुकास्तरीय भालाफेक स्पर्धेत १७ वयोगटामध्ये तृतीय क्रमांक मिळविला. त्याची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. श्रीओमचे मार्गदर्शक शिक्षक व प्रशालेचे मुख्याध्यापक प्रशांत सावंत, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून त्याला जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sachin Ghaiwal: मोठी बातमी! सचिन घायवळला शस्त्र परवाना नाकारला, निर्णयानंतर संपूर्ण कुटुंब फरार

Gautam Gambhir कडून भारतीय संघाला 'डिनर पार्टी'; शुभमन गिल, रवींद्र जडेजासह खेळाडू पोहचले कोचच्या घरी; पाहा Video

Ladki bahin Yojana : लाडकी बहीण योजना अडकली केवायसीच्या कचाट्यात...

Pune: पठारे विरुद्ध पठारे! मार खाणारा तो सचिन पठारे मी नाही...; पुण्यातील राष्ट्रवादीच्या 'त्या' राड्याला अनोखे वळण

AUSW vs PAKW: ७९-७ वरून २२१ धावा! पाकिस्तानने लावलेली वाट, पण ऑस्ट्रेलियाची बेथ मुनी-एलना किंग राहिल्या ताठ! वर्ल्ड रेकॉर्डही नावावर

SCROLL FOR NEXT