कोकण

मत्स्य अभियांत्रिकीत वाल्मिकी जयंती

CD

मत्स्य अभियांत्रिकीत
महर्षी वाल्मीकी जयंती
रत्नागिरी ः शहराजवळील शिरगाव येथील मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनमध्ये महर्षी वाल्मीकी यांची जयंती साजरी करण्यात आली. वाल्मीकी यांनी संस्कृत भाषेत रामायणाची रचना केली. त्यांनी लिहिलेले रामायण हे संस्कृत भाषेतील सर्वप्रथम महाकाव्य मानले जाते. म्हणून वाल्मीकी यांना आद्यकवी असे सुद्धा संबोधले जाते. मूलतः वाल्मिकांनी लिहिलेल्या रामायणात २४ हजार श्लोक आणि उत्तरखंडासहित एकूण ७ खंड आहेत. मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. केतन चौधरी यांनी महर्षी वाल्मीकी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर डॉ. चौधरी यांनी त्यांच्या कार्याविषयी माहिती दिली.

भवानगड, राजवाडी
येथे श्रमदान मोहीम
संगमेश्वर ः संगमेश्वर तालुक्यातील राजवाडी व चिखली गावाच्या सीमेवर असलेला टेहेळणी गड भवानगड येथे दुर्गवीर प्रतिष्ठानच्यावतीने स्वच्छतामोहीम राबवण्यात आली. सकाळी आठ वाजता गडावरील भवानीमातेच्या मंदिराची स्वच्छता करून भवानीमातेच्या मूर्तीला व छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मोहिमेला सुरुवात केली. गडावरील पाण्याच्या टाक्यांकडे जाणाऱ्या वाटा साफ करण्यात आल्या व गडावरील वाडासदृश भागातील तसेच बुरुजावरील झाडाझुडपांनी वेढलेला भाग मोकळा करण्यात आला. मोहिमेत प्रशांत डिंगणकर, योगेश सावंत, निशांत जाखी, मंगेश शिवगण, दीप्ती साळवी, प्रणव राक्षे, राहुल रहाटे, स्वरूप नलावडे, प्रतीक्षा बाईत, माही सावंत, सार्थक डोलारे, पराग लिंबूकर, यश राक्षे, तन्मय पावसकर हे दुर्गवीर सहभागी होते.


धनुर्विद्या स्पर्धेसाठी
घोसाळकरचा संघ रवाना
साडवली ः संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथील भाईशा घोसाळकर हायस्कूलने धनुर्विद्या स्पर्धेत जिल्हास्तरावर यश मिळवल्यानंतर सातारा येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी सहा विद्यार्थ्यांचा संघ रवाना झाला. सप्टेंबर महिन्यामध्ये डेरवण येथे झालेल्या जिल्हास्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत भाईशा घोसाळकर हायस्कूलचे अकरा विद्यार्थी विभागासाठी पात्र ठरले. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यातील पात्र खेळाडूंसाठी सातारा येथे स्पर्धा सुरू होत आहेत. या स्पर्धेसाठी प्रशिक्षक संतोष साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली सहा खेळाडूंचा संघ सातारा येथे रवाना झाला.

महाराष्ट्र हायस्कूलचे
स्नेहसंमेलन उत्साहात
चिपळूण : चिपळूण एज्युकेशन सोसायटी संचलित महाराष्ट्र हायस्कूल चिपळूणचे २००१ -०२ बॅचचे स्नेहसंमेलन मनात कायम राहतील अशा आठवणींनी रंगून गेले. संस्थेचे पदाधिकारी, आजी-माजी शिक्षक व माजी विद्यार्थ्यांनी उत्साहात सहभाग घेतला. माजी विद्यार्थी पुन्हा एकदा वर्गात परतल्याचा आनंद अनुभवत होते. जुन्या सहकाऱ्यांशी झालेल्या गप्पांमधून खट्ट्याळ आठवणी, शाळेतील गंमतीजमती आणि शिक्षकांची शिकवण पुन्हा जागी झाली. माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांच्या जुन्या आठवणी ताज्या करून त्यांच्याबाबत कृतज्ञता व्यक्त केली. त्यांनी शाळेला देणगी व शिक्षकांना भेटवस्तू दिल्या तसेच शाळेची शैक्षणिक प्रगती व नव्याने उपलब्ध केलेल्या सोयीसुविधा पाहून समाधान व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sachin Ghaiwal: मोठी बातमी! सचिन घायवळला शस्त्र परवाना नाकारला, निर्णयानंतर संपूर्ण कुटुंब फरार

Gautam Gambhir कडून भारतीय संघाला 'डिनर पार्टी'; शुभमन गिल, रवींद्र जडेजासह खेळाडू पोहचले कोचच्या घरी; पाहा Video

Latest Marathi News Live Update : राजद कार्यकर्त्यांची मसौरी येथील राजद आमदार रेखा देवी यांच्या विरोधात निदर्शने

Ladki bahin Yojana : लाडकी बहीण योजना अडकली केवायसीच्या कचाट्यात...

Pune: पठारे विरुद्ध पठारे! मार खाणारा तो सचिन पठारे मी नाही...; पुण्यातील राष्ट्रवादीच्या 'त्या' राड्याला अनोखे वळण

SCROLL FOR NEXT