swt834.jpg
मध्ये फोटो आहे.
ओळ - ओरोस ः येथील ज्ञानकुंज कॉलेज ऑफ इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी अॅण्ड मॅनेजमेंटमध्ये आयोजित युवक महोत्सव कार्यक्रमात उपस्थित मान्यवर.
ओरोसमधील ''ज्ञानकुंज''मध्ये
युवक महोत्सव उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ८ ः येथील ज्ञानकुंज कॉलेज ऑफ इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी अॅण्ड मॅनेजमेंट येथे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक अंतर्गत विभागीय स्तरावरील युवक महोत्सव उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी कोल्हापूर विभागीय केंद्राचे वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार प्रा. डॉ. आर. व्ही. कुलकर्णी, प्रा. हरिभाऊ भिसे, संजय काटे, विजयसिंह रजपूत, अक्षय नाईक, सौ. सविता पाटील, निकिता देसाई, संस्थाचालक टी. के. मानसपुरे, व्ही. के. मानसपुरे तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ. शुभदा गंजगळे उपस्थित होते. टी. के. मानसपुरे, प्रा. शुभदा गंजगळे, व्ही. के. मानसपुरे यांच्या हस्ते सत्कार सोहळा पार पडला. डॉ. आर. व्ही. कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रा. हरिभाऊ भिसे यांनी विद्यार्थ्यांना युवक महोत्सवाचे महत्व पटवून दिले तर संस्थाचालक नसपुरे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. या महोत्सवात कोल्हापुर विभागातील अनेक अभ्यास केंद्रातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला होता. दोन सत्रात तो साजरा करण्यात आला. पहिल्या सत्रात उद्घाटन व मान्यवराचे स्वागत तर दुसऱ्या सत्रात पारितोषिक वितरण करण्यात आले. यामध्ये ललित विभागातील रांगोळीमध्ये प्रथम क्रमांक राम बिबवणेकर, व्यंगचित्रांमध्ये जयदीप परब, कातरकांमध्ये आकांक्षा राणे, उत्स्फुर्त छायाचित्रकलामध्ये युनुस शेख, भित्तीचित्राध्ये सर्वंश खांबल, मुर्तीकलामध्ये जयदीप परब, स्थळचित्रामध्ये राम बिबवणेकर तसेच वाडःमय विभागामध्ये वत्कृत्व स्पर्धमध्ये शर्वरी कदम, वादविवाद स्पर्धमध्ये दिप्ती फाटक, काव्य वाचन दिप्ती फाटक, प्रश्नमंजुषामध्ये गगन कामटेकर, वेदांत तारळेकर, तसेच सुगम गायनामध्ये ऐश्वर्या चव्हाण, शास्त्रीय गायनामध्ये मानसी करंदीकर, तालवाद्यामध्ये हरीदास घेवडे, शास्त्रीय नृत्यामध्ये शीवांगी आखाडे, लोकवाद्य वादनामध्ये ज्ञानकुंज कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकवला. सूत्रसंचालन प्रा. स्नेहल कदम यांनी केले तर प्रा. प्रितीश लाड यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.