कोकण

सिंधुदुर्ग लिजेंड क्रिकेटर्सची सभा कुडाळमध्ये उत्साहात

CD

97524

सिंधुदुर्ग लिजेंड क्रिकेटर्सची
सभा कुडाळमध्ये उत्साहात

कुडाळ, ता. १० ः सिंधुदुर्ग जिल्हा लिजेंड क्रिकेटर्सला प्रोत्साहन देण्यासाठी निश्चितच सहकार्य केले जाईल, असे प्रतिपादन युवा उद्योजक रुपेश पावसकर यांनी केले. सिंधुदुर्ग जिल्हा लिजेंड क्रिकेटर्स कार्यकारिणीची सभा पी. एफ. डान्टस सभागृह ओरोस येथे अध्यक्ष दीपक भोजने यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
या सभेत क्रिकेटबाबत काय करता येईल तसेच ज्येष्ठ सदस्यांना कसा आनंद देता येईल, याबाबत विचार विनिमय झाला. भोजने यांनी, संघटनेत कोणीही लहान-मोठा नाही. सावंतवाडी, कणकवली, मालवण, कुडाळ, देवगड येतील सर्व ज्येष्ठांनी या सभेच्या निमित्ताने सर्वांचा आत्मविश्वास जागृत केला, असे सांगितले. खजिनदार सचिन पाटकर यांनी मनोगत व्यक्त केले. संघटनेच्या कार्यकारिणीची पहिलीच सभा यशस्वी झाल्याने सर्वांनी समाधान व्यक्त केले. ज्येष्ठ खेळाडू नंदू टिकले, श्री. पराडकर, श्री. कुबल, राजन नाईक, नानाजी सारंग, बाबा सावंत, वासू वरावडेकर, किशोर शेलटकर, बाळा मडगावकर, रघुजी धारणकर, श्री. कल्याणकर, सुशील शेडगे, गुरू पालव, धनुजी टेमकर, अजय मोर्ये, सचिन पाटकर, सुरेंद्र मडगावकर, संतोष मडगावकर, महेश भाट, बाळा चोडणकर, अरुण घाडी, बावतीस माडतीस, भरत गरुडकर, सचिन तोंडवळकर, दत्ताराम वराडकर, महेश धोंड, राजेंद्र काळसेकर, चंद्रशेखर कुडाळकर, रुपेश शिरोडकर, राजन पांचाळ, दिनेश कुडाळकर, सलाम खान आदी उपस्थित होते. वासू वरवडेकर यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CNG दरवाढीचा नवा धक्का! गेल्या ११ दिवसांतील ही चौथी वाढ... मुंबई-पुण्यात दर किती?

'तो संपूर्ण रात्र दुसऱ्या महिलेसोबत राहिला तरी...' तबिंदा सनपाल नवऱ्याबद्दल बोलताना म्हणाली...'तो दर दिवाळीत तीन किलो सोनं देतो'

Chandgad Drowning Child : आजीच्या निधनामुळे गावी गेल्या अन् तीन शाळकरी मुलींचा शेततळ्यात बुडून मृत्यू, चंदगडमधील घटना; लहान भावाचे प्रयत्न असफल...

Buldhana Tragedy: पत्नीशी वादानंतर टोकाचे पाऊल! चार चिमुकल्यांना विहिरीत ढकलून पित्याने जीवन संपवले, बुलडाण्यात काळजाचा ठोका चुकवणारी घटना

Maharashtra Accident: सोमवार ठरला ‘अपघातवार’; एकच दिवशी १४ जणांचा मृत्यू, आंबेनळीत मोटार कोसळून आठ तर तिहेरी अपघातात सहा जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT