कोकण

प्रकाश कानूरकर यांना ‘आदर्श शिक्षक’

CD

97733

प्रकाश कानूरकर यांना ‘आदर्श शिक्षक’
सावंतवाडी, ता. १० ः वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, कट्टा (ता. मालवण) येथील शिक्षक प्रकाश कानूरकर यांना क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्कार २०२४-२५ जाहीर झाला आहे. हा सन्मान मुंबई येथे आयोजित राज्यस्तरीय कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, राज्यमंत्री डॉ. पंकज भोईर आणि शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे उपस्थित होते. श्री. कानूरकर यांनी गेल्या दोन दशकांहून अधिक काळ शिक्षणाबरोबरच सामाजिक आणि पर्यावरणीय क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य केले आहे. या यशाबद्दल प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. देवयानी गावडे, सर्व शिक्षक शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक यांनी श्री. कानूरकर यांचे अभिनंदन केले. कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त ॲड. एस. एस. पवार, कर्नल शिवानंद वराडकर, अध्यक्ष अजयराज वराडकर, उपाध्यक्ष आनंद वराडकर, सरपंच शेखर पेणकर, सचिव सुनील नाईक, श्रीमती विजयश्री देसाई, सहसचिवएस. डी. गावडे, खजिनदार रवींद्र पावसकर, शालेय समिती अध्यक्ष सुधीर वराडकर आदींनी अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Illegal Drug Injections: हडपसरमध्ये नशेच्या इंजेक्शनची बेकायदा विक्री उघड; सराईत गुन्हेगार अभिषेक भडंगे अटक, ८२ बाटल्या जप्त

Auto Taxi Permit: फेक परमिट रिन्यूअलला लगाम लागणार! ऑटो-टॅक्सी चालकांची आता बायोमेट्रिक ओळख होणार, RTOचा कडक निर्णय

Latest Marathi News Live Update : भाषांतर करण्यासाठी आलेले प्रश्न हवालदारने इतर आरोपींच्या माध्यमातून पोहचवले

Education Recruitment Update: अशासकीय अनुदानित महाविद्यालयांत ५,०१२ सहाय्यक प्राध्यापक भरतीला मंजुरी; आरक्षण अंमलबजावणीसाठी विशेष प्रशिक्षण

पालघरमध्ये मोठा राजकीय भूकंप! शिवसेना-भाजपला खिंडार; बड्या नेत्यांचा बविआमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT