कोकण

कर्वे महिला महाविद्यालयाची बाजी

CD

- rat१०p२.jpg-
२५N९७७३६
रत्नागिरी ः एसएनडीटीच्या सांस्कृतिक युवा महोत्सवात महर्षी कर्वे महिला महाविद्यालयाचे सहभागी झालेल्या विद्यार्थिनी सोबत मान्यवर.

सांस्कृतिक युवा महोत्सवात
कर्वे महिला महाविद्यालयाचे यश
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १०ः कला, साहित्य आणि संस्कृतीचा संगम असलेला एसएनडीटी महिला विद्यापीठाअंतर्गत घेण्यात येणाऱ्या सांस्कृतिक स्पर्धा म्हणजे युवा महोत्सव २०२५-२६ ची अंतिम फेरी एसएनडीटी चर्चगेट येथे झाली. या महोत्सवात महर्षी कर्वे महिला महाविद्यालय रत्नागिरीच्या विद्यार्थिनींनी विविध कलाप्रकारांमध्ये यश मिळवून महाविद्यालयाचा नावलौकिक वाढवला आहे.
युवा महोत्सवात एसएनडीटी विद्यापीठातील एकूण ४७ महाविद्यालये सहभागी झाली होती. विद्यार्थिनींनी एकाहून एक कला सादर करत अनेक पारितोषिके पटकावली. या अंतिम फेरीत महाविद्यालयाने पथनाट्य या स्पर्धाप्रकारामध्ये सुवर्णपदक पटकावले. मुलींसाठी सुरक्षाकौशल्याचे महत्व त्यांनी पटवून दिले. पथनाट्य स्पर्धेसाठी सलग ४ वर्ष प्रथम पारितोषिक मिळवून महाविद्यालयाने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. तसेच स्किट या स्पर्धेत रौप्यपदक तर लोकनृत्य प्रकारात कास्यपदक मिळवले.
युवा महोत्सवातील यशात मीरा सुर्वे या विद्यार्थिनीने इंग्रजी निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला. सानिका कदमने क्ले मॉडलिंग स्पर्धेमध्ये द्वितीय तर आर्या जाधवने कार्टुनिंगमध्ये तृतीय आणि इशिका बाईंगने ऑन दी स्पॉट पेंटिंगमध्ये तृतीय क्रमांक पटकावला. सर्व विद्यार्थिनींना प्रा. प्रतिभा लोंढे तसेच थिएटरसाठी मयूर साळवी, श्रेयस माईन, साहिल चरकरी व नृत्य दिग्दर्शक म्हणून रूपेश धाडवे यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व विजेत्या विद्यार्थिनींचे महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या स्नेहा कोतवडेकर, रत्नागिरी प्रकल्पाच्या अध्यक्षा विद्या कुलकर्णी, प्रकल्पप्रमुख मंदार सावंतदेसाई यांनी अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karnataka Politics: डीके शिवकुमार CM बनण्याआधीच कर्नाटकमध्ये प्रेशर पॉलिटिक्स! दलित-लिंगायत समाजाकडून मोठी मागणी, काँग्रेससमोर नवी डोकेदुखी

Mahur Renuka Devi Temple: माहूर गडावरील श्री रेणुका देवीला आंब्याची आरास; अधिक महिन्यात भाविकांची मोठी गर्दी

Baramati Sugarcane Farming: पणदरेत ‘ऊस शेतीची नवी दिशा’ परिसंवादाला उत्स्फूर्त प्रतिसाद; एकरी १०० टन ऊस उत्पादनासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शक दिशा

Chakan Onion Price Row: कांदा दरप्रश्नी चाकण बैठक की राजकीय आखाडा? शेतकरी संघटनेच्या नेत्यांत वाद

Pune Toxic Liquor: पुणे-पिंपरीतील विषारी दारूकांडाचा उगम उरुळीकांचन? स्थानिक तरुणाचा मृत्यू, भेसळ रॅकेटवर संशय तीव्र

SCROLL FOR NEXT