कोकण

''दीक्षा खून प्रकरणातील संशयितास कडक शिक्षा व्हावी''

CD

swt1018.jpg
97816
सिंधुदुर्गनगरी ः जिल्हा पोलिस अधीक्षक मोहन दहिकर यांची बागवे कुटुंबीयांनी भेट घेत चर्चा केली.

‘दीक्षा बागवे खून प्रकरणातील
संशयितास कडक शिक्षा व्हावी’
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. १० ः दीक्षा बागवे खून प्रकरणातील संशयित आरोपीला कडक शिक्षा व्हावी, अशी मागणी बागवे कुटुंबीयांनी माजी आमदार वैभव नाईक यांच्यासमवेत जिल्हा पोलिस अधीक्षक मोहन दहिकर यांची भेट घेत केली.
दीक्षा बागवे खून प्रकरण ही सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अत्यंत दुर्दैवी घटना आहे. यातील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा झाली, तरच असे कृत्य करण्याची कोणाची हिंमत होणार नाही. याप्रकरणी सखोल तपास करून आरोपीला कडक शिक्षा मिळण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी माजी आमदार वैभव नाईक व बागवे कुटुंबीयांनी श्री. दहीकर यांच्याकडे केली आहे. संशयित आरोपी कुणाल कृष्णा कुंभार (रा. गोठोस मांडशेतवाडी) याने खुनाची कबुली दिली आहे.
याप्रकरणी बागवे कुटुंबीयांनी श्री. नाईक यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली तसेच आज श्री. नाईक यांच्या समवेत दीक्षा बागवे हिची बहीण प्रतिमा बागवे व योगेश कुबल यांनी श्री. दहीकर यांची आज भेट घेत पोलिस तपासाबाबत माहिती घेतली. याप्रसंगी ठाकरे शिवसेनेचे कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune crime and politics: विषारी दारू, वाढते गुन्हे आणि बिघडलेली कायदा-सुव्यवस्था; पुणे पोलिस व राज्य सरकारवर सुप्रिया सुळे यांचा निशाणा

Loni Kalbhor crime news: विषारी रासायनिक ताडी प्रकरणात लोणी काळभोरमध्ये आई-मुलगा अटकेत; घातक स्फटिकांसह मुद्देमाल जप्त

Polytechnic Student Death : छ. संभाजीनगर हादरलं! "माझ्या मित्राच्या बहिणीला का छेडतोस?", संशयातून पॉलिटेक्निकच्या 17 वर्षीय विद्यार्थ्याचा निर्घृण खून, मुख्य संशयित फरार

IPL 2026, Video: एकट्या १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने झुंज दिली, पण संघाने साथ सोडली; अश्विनचा राजस्थान रॉयल्सवर हल्लाबोल

Palghar: स्विमिंग पूलमध्ये खेळाताना पाण्यात पडला, चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू; कुटुंबियांचा मन हेलावणारा आक्रोश, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT