कोकण

रत्नागिरी-माजी आमदार बच्चू कडू सोमवारी रत्नागिरीत

CD

rat10p17.jpg-
97802
रत्नागिरी ः पत्रकार परिषदेत माहिती देताना प्रहार जनशक्ती पक्षाच्या ठाणे जिल्हाप्रमुख काजल नाईक आणि पदाधिकारी.
----------------
माजी आमदार बच्चू कडू
सोमवारी रत्नागिरीत
३६ जिल्ह्यांच्या दौऱ्याचा समारोप; आंदोलनाची सुरवात
रत्नागिरी, ता. १० : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीकडे शासनाने केलेले दुर्लक्ष, आंबा बागायतदार, मच्छीमारांवर होत असलेला अन्याय, दिव्यांगांच्या पेन्शनचा प्रश्‍न, जिंदल कंपनीच्या राखेमुळे होणाऱ्या प्रदुषणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष, बनावट नाहरकत दाखला घेऊन उभारण्यात येणाऱ्या गॅस टर्मिनलप्रकरणी फौजदारी कारवाई का नाही, गॅसगळतीबाबत अजून दोषारोपपत्र का दाखल झाले नाही, लांजा येथील उपोषणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष का?, अशा अनेक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष माजी आमदार बच्चू कडू सोमवारी (ता. १३) रत्नागिरीत येणार आहेत, अशी माहिती प्रहार जनशक्ती पक्षाच्या ठाणे जिल्हाप्रमुख काजल नाईक यांनी दिली.
शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेत त्या म्हणाल्या, बच्चू कडू यांनी राज्य सरकारचा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या आश्वासनाचा पडलेला विसर तसेच अवकाळी पाऊस आणि शेतमालाच्या नुकसानीकडे होत असलेले गंभीर दुर्लक्ष या विरोधात मोठे पाऊल उचलले आहे. विस्मरणात गेलेल्या सरकारला जागे करण्यासाठी त्यांनी नागपूर येथील विधानसभेला घेराव घालण्याचा निर्धार केला असून, या भव्य आंदोलनाची सुरवात १३ ऑक्टोबरला रत्नागिरी शहरात आयोजित शेतकरी मेळाव्याने होणार आहे. कडू यांनी ३६ जिल्ह्यांचा झंझावाती दौरा पूर्ण केला. या दौऱ्याचा समारोप रत्नागिरीत होणार आहे.
दौऱ्यात ते जिंदाल कंपनीने उभारलेल्या टर्मिनलची पाहणी करणार आहेत. दुपारी १.३० वाजता रत्नागिरीतील नाट्यगृहात होणाऱ्या या मेळाव्यात आंबा, मच्छीमार, पर्यटन आणि दिव्यांग यांच्या स्थानिक प्रश्नांवर उपस्थितांना मार्गदर्शन करतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलासह कुटुंब संपवेन! व्हिडीओ कॉलवर कपडे काढायला लावले; ४३ वर्षीय महिलेचा VIDEO केला व्हायरल; २३ ते २८ वर्षांच्या तिघांना अटक

Pune Crime : कारागृहातूनही आंदेकर टोळी सक्रिय; पुणे पोलिस आयुक्तांचे कारागृह प्रशासनाला कडक निर्बंधांचे पत्र

America-Pakistan Relations: 'शांतिदूत' बनलेल्या पाकिस्तानला अमेरिकेचा दणका; ट्रम्प यांचा 'तो' प्रस्ताव ऐकून शहबाज यांना शब्द फुटेना

NEET paper leak: मनीषा हवालदार 'एनटीए'मध्ये अनुवादक म्हणून होती कार्यरत; पेपर कसा फोडला? तपासात झालं उघड

Panshet Tragedy: पानशेत धरणात कोंढव्यातील २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; मित्रांसमोर घडली दुर्दैवी घटना

SCROLL FOR NEXT