कोकण

बिबट्याकडून शेळी फस्त केल्याने हानी

CD

बिबट्याकडून शेळी
फस्त केल्याने हानी
कुडाळ ः गोवेरी-भगतवाडी येथील शेतकरी गुंडू लक्ष्मण पालकर यांच्या मालकीच्या शेळीवर शुक्रवारी भर दिवसा जंगलमय भागात बिबट्याने हल्ला करून तिला ठार केले. त्यामुळे पालकर यांचे सुमारे बारा हजाराचे नुकसान झाले आहे. पालकर हे शुक्रवारी आपली गुरे व शेळ्या घेऊन घरापासून दीड किमी अंतरावर असलेल्या जंगलमय भागात गेले होते. गुरे व शेळ्या चरत असताना दुपारी दोनच्या सुमारास बिबट्याने त्यांच्या एका शेळीवर हल्ला केला. पालकर यांनी आरडाओरडा केला, तेव्हा बिबट्याने शेळीला तेथेच टाकून पळ काढला. मात्र, त्या शेळीचा मृत्यू झाला. या घटनेनंतर ग्रामपंचायत सदस्य मोहन जाधव यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. वनविभागामार्फत या घटनेचा पंचनामा केल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, संबंधित शेतकऱ्याला योग्य भरपाई द्यावी, अशी मागणी बब्रुवान भगत यांनी केली आहे. येथे गव्याचा चा कळपही असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
....................
आडेलीतील एकास
पोलिस कोठडी
वेंगुर्ले ः मठ हायस्कूलच्या गेटच्या भिंतीस मोटार धडकवून अपघातास कारणीभूत ठरलेला व नंतर पोलिस अधिकाऱ्यांनाच धक्काबुक्की करणाऱ्या आडेली येथील साईप्रसाद उफ गोट्या विजय नाईक (३२) याला कुडाळ न्यायालयात हजर केले असता वेंगुर्ले पोलिसांच्या मागणीनुसार कुडाळ न्यायालयाने संशयिताला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. वेंगुर्ले कोर्ट रजेवर असल्याने सदर संययिताला वेंगुर्ले पोलिसांनी कुडाळ सत्र न्यायालयात हजर केले होते. अपघातग्रस्त गाडीचा पंचनामा करण्यासाठी वेंगुर्ले पोलिस घटनास्थळी आले असता संशयिताने पोलिसांना धक्काबुकी करीत मारण्याची धमकी देत शिवीगाळही केली होती. पोलिसांनी संशयिताला अटक करून शनिवारी कुडाळ न्यायालयात हजर केले. यावेळी न्यायाधिशांनी संशयितास सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. प्रकरणाचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक योगेश राठोड करीत आहेत.
................
शिडवणे गांगेश्वर मंदिरात
४ नोव्हेंबरला कार्यक्रम
कणकवली ः शिडवणे येथे श्री देव गांगेश्वर चांदीच्या मुखवट्याची विधीपूर्वक प्रतिष्ठापना व त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव ४ नोव्हेंबरला श्री देव गांगेश्वर मंदिरात करण्यात येणार आहे. यात सकाळी ८.३० वा. मुकुटाची पालखी मिरवणूक प्रारंभ, १० वा. श्री गांगेश्वर मंदिर येथे आगमन, १०.३० ते १२.३० वा. लघुरुद्र व महाआरती, दुपारी १.३० वा. महाप्रसाद, सायं. ७ महाआरती, रात्री ९ वा. पासून स्थानिक भजने, १० वा. ओटी भरणे, १२ वा. दीपोत्सव आदी कार्यक्रम होणार आहेत.
..................
कुडाळ येथे
ग्रंथ प्रदर्शन
कुडाळ ः महाराष्ट्र शासनातर्फे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर हा जन्मदिवस ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने १५ ला कुडाळ येथील रा. ब. अनंत शिवाजी देसाई वाचनालयातर्फे (जिल्हा ग्रंथालय) खरेदी केलेल्या ग्रंथांचे प्रदर्शन मांडण्यात येणार आहे. हे प्रदर्शन सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत वाचकांसाठी खुले राहणार आहे. ग्रंथप्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन वाचनालय कार्यवाह डॉ. विवेक पाटणकर यांनी केले आहे.
...................
बांदेकर कालेजमध्ये
आकाश कंदील प्रदर्शन
सावंतवाडी ः येथील बांदेकर कॉलेज ऑफ फाईन आर्टतर्फे १४ ऑक्टोबरला आकाश कंदील प्रदर्शन, विक्री कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाला उद्‍घाटक म्हणून श्रद्धाराजे सावंत भोसले, अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष रमेश भाट आदी उपस्थित राहणार आहेत. सर्वांनी उपस्थित राहवे, असे आवाहन प्राचार्य उदय वेले यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Water Taxi: मुंबईतील वॉटर टॅक्सीचे काम कधी पूर्ण होणार? मोठी अपडेट आली समोर, वाचा सविस्तर...

INDW vs AUSW: एलिस पेरी आऊट न होताच गेली मैदानाबाहेर, पण भारताविरुद्ध कर्णधार एलिसा हेलीचं शतक

Kolhapur : आमदाराला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याच्या प्रकरणात मोठी अपडेट, बहीण-भावानेच केलेलं कांड; मैत्री करत...

माेठी बातमी! उपमुख्यमंत्री अजित पवार ॲक्शनमोडवर; आमदार संग्राम जगताप यांना नोटीस देणार; नेमकं काय प्रकरण?

Barshi fraud:'रामगिरी शुगर्स कारखान्याची जमीन गहाण'; २ कोटी १० लाखाची फसवणूक, बार्शी पोलिसांत दोन महिलांसह सात जणांविरोधात गुन्हा

SCROLL FOR NEXT