कोकण

चिपळूण-डेरवणमध्ये जिल्हास्तरीय खो खो स्पर्धा उत्साहात

CD

डेरवणमध्ये जिल्हास्तरीय
खो खो स्पर्धा उत्साहात
चिपळूण, ता. १३ : श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्ट क्रीडासंकुलात शालेय जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धा उत्साहात झाली. या स्पर्धेमध्ये १४, १७ व १९ वर्ष वयोगटातील मुलांचे २७ व मुलींचे २७ संघ अशा एकूण ८१० खेळाडूंनी विक्रमी सहभाग नोंदविला होता.
स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे, क्रीडा कार्यकारी अधिकारी ऐश्वर्या सावंत, क्रीडा संचालक श्रीकांत पराडकर, रत्नागिरी जिल्हा खो-खो असोसिएशनचे संदीप तावडे, विनोद मयेकर, राकेश मालप यांच्या उपस्थित झाले.
स्पर्धेत १४ वर्षाखालील मुलांमध्ये लांजा संघाने अंतिम सामन्यात चिपळूण संघाचा पराभव करून विजेतेपद पटकावले. तसेच राजापूर संघाने तृतीय क्रमांक पटकाविला. मुलींमध्ये रत्नागिरी संघाने अंतिम सामन्यात लांजाचा पराभव करून विजेतेपद पटकावले. तसेच चिपळूण संघाने तृतीय क्रमांक पटकाविला.
१७ वर्षाखालील मुलांमध्ये लांजा आणि राजापूर यांच्यात झालेल्या अटीतटीच्या अंतिम सामन्यात लांजा या संघाने प्रथम क्रमांक पटकावला. राजापूर संघाने तृतीय क्रमांक पटकाविला. मुलींमध्ये रत्नागिरी आणि राजापूर यांच्यात झालेल्या अटीतटीच्या अंतिम सामन्यात रत्नागिरी संघ विजयी ठरला. खेड तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला. १९ वर्षाखालील मुलांमध्ये संगमेश्वर संघ विजेतेपदाचा मानकरी ठरला, तर राजापूर संघाने द्वितीय क्रमांक पटकाविला. रत्नागिरी तृतीय क्रमांकावर राहिली. मुलींच्या अंतिम सामन्यात संगमेश्वर संघाने रत्नागिरी संघावर रोमहर्षक विजय मिळवून विजेतेपद पटकाविले. चिपळूण संघाने तृतीय क्रमांक पटकाविला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पगार वाढल्याशिवाय कामावर नाही येणार, कामगार ठाम; जाळपोळ आणि तोडफोड सुरूच, ७ FIR, ३०० जण ताब्यात

Kolhapur Danoli Crime : कोल्हापुरातील दानोळीमध्ये अपहरण करून खून, २५ लाखांची मागणी, भरतेशचा कारण नसताना बळी, घटनास्थळी आमदार यड्रावकर दाखल

Pune Crime: हवेली तालुक्यात जमिनीच्या वादातून शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; परस्पर विरोधात फिर्याद, ८ जणांविरुद्ध गुन्हा!

Latest Marathi News Update: नेस्कमधील कॉन्सर्टचा आणखी एक व्हिडिओ समोर, अनेकांनी ड्रिंक अँड ड्राईव्ह केल्याचा ही अंदाज

Pune Solapur flight: पुण्याहून सोलापूर आता ४० मिनिटांत पोहोचणे शक्य होणार; १ मेपासून स्टार एअरची विमानसेवा, नवीन स्लॉट मंजूर!

SCROLL FOR NEXT