कोकण

रत्नागिरी- भारत शिक्षण मंडळ करतेय शुद्धतेने काम

CD

rat12p21.jpg
98095
रत्नागिरी : भारत शिक्षण मंडळाच्या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना सदानंद भागवत. यावेळी डॉ. श्रीरंग कद्रेकर, नंदकुमार साळवी, शिवनाथ बियाणी व नमिता कीर. (मकरंद पटवर्धन : सकाळ छायाचित्रसेवा)

भारत शिक्षण मंडळ करतेय शुद्धतेने काम
सदानंद भागवत : इमारतीचे उद्घाटन, देणगीदारांचा सत्कार
रत्नागिरी, ता. १३ : कोकणात भारत शिक्षण मंडळासारख्या संस्था १०० वर्षांपासून शुद्धतेने काम करत आहेत. त्यामुळे जिल्ह्याचा लौकिक देशात आहे. या जिल्ह्याने आतापर्यंत सर्वाधिक भारतरत्न दिले आहेत. विद्यार्थ्यांचा वैचारिक विकास व्हायला हवा, असे सकारात्मक ब्रेन वॉशिंग करायला हवे. अशा प्रसंगी भारत शिक्षण मंडळाची जबाबदारी अधिक वाढते. आजपर्यंत या संस्थेने असे अनेक विद्यार्थी घडवले आहेत. तशाच प्रकारे विकसित भारतात योगदान देणाऱ्यांची पिढी म्हणजे आजच्या विद्यार्थ्यांना घडवले पाहिजे, असे प्रतिपादन रत्नागिरी जिल्हा शिक्षण संस्था संघाचे अध्यक्ष सदानंद भागवत यांनी केले.
भारत शिक्षण मंडळाच्या बियाणी बालकमंदिर, कृ. चिं. आगाशे प्राथमिक विद्यामंदिर व संजीवन गुरुकुलच्या प्रशस्त इमारतीचे उद्घाटन आणि देणगीदारांचा सत्कार समारंभप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. नमिता कीर यांनी प्रास्ताविक केले. परिचय मुख्याध्यापिका प्राजक्ता कदम यांनी करून दिला. नंदकुमार साळवी, नमिता कीर, डॉ. अलिमियॉं परकार, माजी कुलगुरु डॉ. श्रीरंग कद्रेकर, उद्योजक शिवनाथ बियाणी (जयसिंगपूर) उपस्थित होते.

कोट
मी या शाळेत शिकलो. शिष्यवृत्ती व समाजाच्या मदतीमुळे उच्च शिक्षण घेऊ शकलो त्यामुळे मी सेवानिवृत्तीनंतर शाळेच्या कामात झोकून दिले. मुंबई महापालिका आणि भारत शिक्षण मंडळात मला बरेच शिकायला मिळाले. ही इमारत पूर्ण करण्याचे माझे स्वप्न पूर्ण झाले.
- नंदकुमार साळवी, अध्यक्ष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tej Pratap Yadav on Bihar Assembly Election : अखेर तेजप्रताप यादव यांनी बिहार विधानसभा लढवण्यासाठी मतदारसंघ केला जाहीर!

Kannad News : कन्नड तालुक्यातील ८ जिल्हा परिषद गटाचे, तर १६ पंचायत समिती गणाचे आरक्षण जाहीर

Latest Marathi News Live Update:मैनपुरी येथील एका गोदामात आग लागली

स्वतः उपाशी राहून मुलाला जेवण भरवत होती गिरीजा ओक; सासूबाई आल्या आणि...

Baramati News : तर दोन हजार वाहनांसह बारामतीचा चक्का जाम करणार; हायवा संघटनेचा प्रशासनाला इशारा

SCROLL FOR NEXT