कोकण

गणित प्रावीण्य परिक्षेत मिलाग्रीस हायस्कूलचे यश

CD

swt१०१६.jpg
९७७८४
सावंतवाडी ः गणित प्रावीण्य परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांसमवेत शिक्षक.

गणित प्रावीण्य परिक्षेत मिलाग्रीस हायस्कूलचे यश
सावंतवाडी, ता. १० ः जिल्हा गणित अध्यापक मंडळामार्फत आयोजित पाचवी व आठवीसाठी गणित संबोध परीक्षेमध्ये मिलाग्रीस हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
पाचवीत एकूण ३५ विद्यार्थी परीक्षेसाठी नोंदणीकृत होते, त्यापैकी ३३ विद्यार्थी गणित प्रावीण्य परीक्षेस पात्र ठरले. यामध्ये मयुरेश मोर्ये आणि अथर्व गावडे प्रथम, वीर राऊळ द्वितीय, तर गौरांग टोपले, कृती टोपले, मनवा सावंत तृतीय. आठवीत २९ विद्यार्थी नोंदणीकृत होते, त्यापैकी २२ विद्यार्थी गणित प्राविण्य परीक्षेस पात्र ठरले. यामध्ये जान्वी गवंडे आणि शुभंकर पाटकर प्रथम, आयुष गावडे द्वितीय, तेजल जाधव, शॉन रॉड्रिग्स तृतीय. पाचवीच्या विद्यार्थ्यांना श्रीमती प्रणाली रेडकर आणि श्रीमती फ्लोरिंडा फर्नांडिस यांचे, तर आठवीच्या विद्यार्थ्यांना बॉनी डिसोजा व मार्टिन डेसा यांचे मार्गदर्शन लाभले. प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदाना, पर्यवेक्षिका श्रीमती संध्या मुणगेकर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
-----------------
swt109.jpg
97758
फणसगाव ः येथील महाविद्यालयात मेणबत्ती व साबण तयार करणे प्रशिक्षणात सहभागी विद्यार्थी व शिक्षक.

फणसगाव महाविद्यालयात मेणबत्ती प्रशिक्षण
तळेरे ः केंद्राच्या ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेतून युवा वर्गाला स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्याच्या हेतूने आणि दिवाळीचे औचित्य साधून कला व वाणिज्य महाविद्यालय फणसगाव येथे करियर कट्टा महिला विकास कक्ष उद्योजकता विभाग आणि एनएसएस यांच्या वतीने विद्यार्थ्यांना मेणबत्ती व साबण तयार करणे प्रशिक्षण वर्गाचे आयोजन केले होते. यावेळी प्रशिक्षक स्नेहा बांबुळकर यांनी विद्यार्थ्यांना विविध फॅन्सी प्रकारांच्या मेणबत्ती तसेच वेगवेगळ्या आकारातील साबण बनविण्याचे प्रशिक्षण दिले. यातून आपण आपला उद्योग कसा निर्माण करता येईल, याचे मार्गदर्शनही त्यांनी यावेळी केले. या प्रशिक्षणामध्ये प्राचार्या अनुश्री नारकर, करिअर कट्टा विभागप्रमुख प्रा. जानवी नारकर, प्रा. सुचिता चव्हाण, प्रा. ज्योत्सना कदम, एनएसएस विभागप्रमुख प्रा. विनायक जमदाडे यांनी सहभाग नोंदविला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW, World Cup: भारताचा सलग दुसरा पराभव! एलिसा हेलीच्या ऑस्ट्रेलियाने सर्वात मोठे लक्ष्य पार करत घडवला इतिहास

Mumbai: एसटी संघटनांमध्ये कुरघोडीचे राजकारण! आंदोलनाचे श्रेय घेण्यावरून चढाओढ, उपमुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत तोडगा सुटणार

Water Taxi: मुंबईतील वॉटर टॅक्सीचे काम कधी पूर्ण होणार? मोठी अपडेट आली समोर, वाचा सविस्तर...

INDW vs AUSW: एलिस पेरी आऊट न होताच गेली मैदानाबाहेर, पण भारताविरुद्ध कर्णधार एलिसा हेलीचं शतक

Kolhapur : आमदाराला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याच्या प्रकरणात मोठी अपडेट, बहीण-भावानेच केलेलं कांड; मैत्री करत...

SCROLL FOR NEXT