कोकण

मोफतचे अति अन् शेतकऱ्यांची माती

CD

मोफतचे अति अन् शेतकऱ्यांची होतेय माती

विलास गांगण ः कोकण विकास आघाडीचा ४७ वा वर्धापन दिन

कणकवली, ता. १३ ः ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मते गेल्या ११ वर्षांत देशातील २५ कोटींपेक्षा अधिक जनता दारिद्र्य रेषेच्यावर आली आहे. मात्र, दारिद्र्य रेषेखालील कुटुंबीयांची यादी घटलेली दिसत नाही. धान्य मुबलक, मोफत देण्याच्या योजनेमुळे शेती-बागायती फुलविणाऱ्या बळीराजाला मजूरच मिळत नसल्याने भविष्यात त्यांच्याच कुटुंबावर दारिद्र्य रेषेखालील कुटुंब होण्याची टांगती तलवार आहे. केंद्र शासनाच्या या योजनेमुळे ‘मोफतचे होत आहे अति नि शेतकऱ्यांची होत आहे माती,३ अशी परिस्थिती देशभरात निर्माण झाली आहे,’’ अशी खंत कोकण विकास आघाडीचे उपाध्यक्ष, राजापूर रायपाटणचे माजी सरपंच विलास गांगण यांनी व्यक्त केली.
दादर येथील शारदाश्रम विद्यालयात कोकण विकास आघाडीचा ४७ वा वर्धापन दिन नुकताच झाला. यावेळी श्री. गांगण बोलत होते. संस्थापक-अध्यक्ष मोहन केळुसकर प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे विलास गांगण यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. यावेळी शेतकरी श्री. गांगण यांनी सार्वत्रिक मनातील ही खदखद व्यक्त केली. सरचिटणीस एकनाथ दळवी, मुंबईचे माजी नगरसेवक विजयकुमार दळवी, प्रकाश तावडे, मनोहर डोंगरे, भाई चव्हाण उपस्थित होते. यावेळी कोकणातील उपस्थित रमाकांत जाधव, चंद्रकांत आंब्रे, आनंद साळवी, अंकुश काते, श्रीपाद केसरकर, भालचंद्र तारी, नरेंद्र म्हात्रे, गणपत परब, रमेश आंग्रे, पुनाजी गुरव आदींनी विलास गांगण यांच्या भूमिकेचे समर्थन केले.
--
४७ वर्षांची अखंड वाटचाल
‘कोविआ’चा ४७ वा वर्धापनदिन हे वाचून प्रथमच उपस्थित राहिलेले विविध क्षेत्रांत देश-विदेश पातळीवर कार्यरत असलेले सर्वश्री डॉ. प्रशांत सावंत, ॲड. डॉ. नीलेश पावसकर, गणपत परब यांनी ‘कोविआ’च्या आजवरच्या कार्याच्या वाटचालीचे कौतुक केले. ‘‘आम्ही त्रिमूर्ती भविष्यात ‘कोविआ’च्या पालखीचे भोई होऊन उज्ज्वल भविष्यासाठी प्रामाणिकपणे क्रियाशील राहू,’’ असे ठामपणे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Election 2025: बिहार निवडणूक! एनडीएमध्ये नाराजी? 'या' दोन पक्षांनी व्यक्त केली खदखद

Vaijapur News : जिल्हा परिषद, पंचायत समिती आरक्षणामुळे काहींचे स्वप्न राहणार अधुरे; काहींचे चेहरे खुलले

Uttar Pradesh : CM योगींकडून प्रेरणा घेऊन उभी केली ‘मोरिंगा आर्मी’ PM मोदींनीही केलं लखनऊमधील महिलेचे कौतूक

Pune News : अनधिकृत फ्लेक्सचा दंड नसल्याची उमेदवारांना घ्यावी लागणार एनओसी

Wagholi News : कामगारांकडून बेदम मारहाणीत एका चोरट्याचा मृत्यू; ११ जणांवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT