कोकण

विजयदुर्ग मार्गावर एसटीची गरज

CD

९८२५९

विजयदुर्ग मार्गावर
एसटीची गरज ः
दिलदार चौगुले
देवगड, ता. १३ ः तालुक्यातील विजयदुर्ग भागातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी एसटी फेरीची व्यवस्था करण्यात यावी अशी गिर्ये येथील सामाजिक कार्यकर्ते दिलदार चौगुले यांची मागणी आहे. आपल्या मागणीचे निवेदन त्यांनी एसटीच्या विभाग नियंत्रकांना पाठवल्याची माहिती त्यांनी दिली. विजयदुर्ग भागातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची परतीच्या प्रवासावेळी मोठी गैरसोय होत असल्याने त्यादृष्टीने एसटीची फेरी सोडण्याची श्री. चौगुले यांची मागणी आहे. याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, तालुक्यातील विजयदुर्गपासून पडेल कँटीनपर्यंतच्या भागातील बरीचशे महाविद्यालयीन विद्यार्थी देवगडला शिक्षणासाठी येतात. परंतु, परतीच्यावेळी महाविद्यालय सुटल्यावर सायंकाळच्यावेळी ५ वाजता विजयदुर्ग येथे येण्यासाठी थेट एसटी फेरी नसल्याने मोठी गैरसोय झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना नाईजास्तव पडेल कँटीन येथे उतरून दुसर्‍या गाडीने विजयदुर्ग प्रवास करावा लागतो. एसटी फेर्‍यांची संख्या कमी असल्याने उपलब्ध गाडीत गर्दी होते. त्यामुळे चेंगराचेंगरीने विद्यार्थी हतबल होत असल्याचे दिसून येते. २०२१ मध्ये विजयदुर्ग आगाराची या मार्गावर थेट बसफेरी होती. परंतु, ती गेली सुमारे तीन वर्षे बंद आहे. त्यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. याबाबत स्थानिक ग्रामस्थ, पालक यांनी विजयदुर्ग आगार व्यवस्थापक यांना निवेदन दिले आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे देवगडहून विजयदुर्ग मार्गावर एसटी फेरीची व्यवस्था करावी, अशी मागणी श्री. चौगुले यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: आई, शप्पथsss...! श्रेयस अय्यरचा अविश्वसनीय झेल पाहून रोहित शर्मा अवाक्... सूर्याचे डोळे विस्फारले... IPL2026 मधील बेस्ट कॅच

LPG वर संकट की दिलासा? होर्मुझ तणावातही सरकारचं मोठं आश्वासन; तुमच्या घरच्या गॅसबद्दल जाणून घ्या सत्य!

SCROLL FOR NEXT