कोकण

पावशी गण अनुसुचित महिलेसाठी

CD

98310

पावशी गण अनुसुचित महिलेसाठी

कुडाळ पंचायत समिती; १८ पैकी १३ गण खुले

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १३ ः तालुक्यातील पावशी पंचायत समिती गण अनुसूचित जाती महिलेसाठी आरक्षित झाला. १८ पैकी १३ गण खुले झाले.
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कुडाळ पंचायत समिती सदस्य पदांच्या आरक्षण निश्चितीची सोडत आज तहसील कार्यालयात जाहीर करण्यात आली. कुडाळ पंचायत समिती सदस्य पदांसाठी अनुसूचित जाती, जमाती, महिला व इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी आरक्षण ठरविण्याची ही सोडत प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पडली. प्रांताधिकारी ऐश्वर्या काळूशे यांच्या उपस्थितीत तहसीलदार विरसिंग वसावे यांनी एकूण १८ गणासाठी आरक्षण जाहीर केले. अनुसूचित जमातीची लोकसंख्या पुरेशी नसल्याने त्याचे आरक्षण जाहीर केले नाही. त्यामुळे सुरुवातीला पावशी प्रभागापासून सुरुवात केली. सर्वांत जास्त अनुसूचित जातीची लोकसंख्या पावशीमध्ये असल्याने आणि गेल्यावेळी सर्वसाधारण अनुसूचित जाती आरक्षण असल्याने यावेळी पावशीला अनुसूचित महिलांसाठी आरक्षण जाहीर केले. त्यानंतर नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण आणि महिलेसाठी आरक्षण जाहीर केले. त्यात आंब्रड, डिगस नागरिकांचा मागास प्रवर्ग, गोठोस आणि घावनळे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आरक्षण आहे. उरलेल्या तेरा गणासाठी सर्वसाधारण आरक्षण जाहीर करण्यात आले. त्यामध्ये जांभवडे, कसाल, ओरोस बुद्रुक, तेंडोली, साळगाव, माणगाव, झाराप यांच्यासाठी सर्वसाधारण तर आवळेगाव, वेताळबांबर्डे, नेरूर देऊळवाडा उत्तर, नेरूर देऊळवाडा दक्षिण, पाट, पिंगुळीसाठी सर्वसाधारण महिला आरक्षण पडले आहे. सृष्टी गावडे आणि रणवीर गावडे या मुलांनी आरक्षणाच्या चिठ्या काढल्या.
..................
आरक्षण असे
* अनुसूचित महिला- पावशी
* नागरिकांचा मागास प्रवर्ग-डिगस, आंब्रड
* नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला- घावनाळे, गोठोस
* सर्वसाधारण महिला - वेताळ बांबर्डे, पिंगुळी, नेरूर देऊळवाडा उत्तर, आवळेगाव, नेरूर देऊळवाडा दक्षिण, पाट
* सर्वसाधारण -झाराप, साळगाव, ओरोस बुद्रुक, कसाल, माणगाव, जांभवडे, तेंडोली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT