कोकण

मंडणगडातील चार पंचायत समिती गणांचे आरक्षण जाहीर

CD

rat13p19.jpg-
98314
मंडणगड : पंचायत समिती गणाचे आरक्षण जाहीर करताना उपजिल्हाधिकारी मारूती बोरकर, तहसीलदार अक्षय ढाकणे.
------------
मंडणगडातील चार गणांचे आरक्षण जाहीर
मंडणगड, ता. १३ ः रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या पुनर्वसन विभागाचे उपजिल्हाधिकारी मारूती बोरकर यांच्या निरीक्षणाखाली मंडणगड पंचायत समिती गणाचे आरक्षण जाहीर करण्यात आले. ही सोडत मंडणगड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात काढण्यात आली. ही सोडत विद्यार्थी आकलाख माटवणकर याच्या हस्ते काढण्यात आली. तहसीलदार अक्षय ढाकणे यांनी संपूर्ण प्रक्रिया नागरिकांना समजावून सांगत निकाल जाहीर केला. जाहीर झालेले आरक्षण असे ः भिंगळोली- सर्वसाधारण, इस्लामपूर- सर्वसाधारण महिला, तुळशी- सर्वसाधारण महिला, बाणकोट-नागरिकांचा मागास प्रवर्ग (खुला). रत्नागिरी येथे झालेल्या जिल्हा परिषदेच्या सोडतीत मंडणगड तालुक्यातील भिंगळोली व बाणकोट हे दोन्ही जिल्हा परिषद गट सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहेत.

चौकट
हरकतींसाठी १७ पर्यंत मुदत
गेल्या चार निवडणुकांतील आरक्षणाचा अभ्यास आणि निकषांची माहिती राजकीय पक्षांना आधीपासून असल्याने कार्यक्रमाला पक्षप्रतिनिधी व नागरिकांची उपस्थिती तुलनेने कमी होती. निवडणूक आयोगाने हरकती नोंदवण्यासाठी १३ ते १७ ऑक्टोबर हा कालावधी निश्चित केला असल्याचे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS Dhoni Fitness: महेंद्रसिंग धोनीचं ठरलं! IPL 2026 चा पहिला सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळणार; पण CSK संघात कोणाची जागा घेणार?

इतिहास जिवंत! गावकऱ्यांनी पुन्हा जगला शिवराय व महाराणी गुणवंताबाईंचा विवाह सोहळा, ३७० वर्षांपूर्वीचा 'तो' दिवस डोळ्यासमोर उभा!

CBSE Class 10 Result: सीबीएसई दहावीचा निकाल जाहीर; यंदा ९३.७० टक्के उत्तीर्ण, मुली पुन्हा आघाडीवर

Akola Summer Heatwave : अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? पारा पोहोचला ४४.२ अंशांवर; सकाळी १० नंतरच रस्ते ओस

Gas Cylinder Black Market : घरगुती गॅसचा काळाबाजार उघडकीस; १०३ गॅस सिलिंडरसह १० लाखांचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT