कोकण

गुहागरातील चार गणात होणात अटीतटीची लढत

CD

गुहागरातील चार गणात
होणार अटीतटीची लढत
१० गणांचे आरक्षण जाहीर; सर्वसाधारण आरक्षणामुळे चुरस
गुहागर, ता. १३ : गुहागर पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीचा आरक्षण सोडत कार्यक्रम पंचायत समिती सभागृहात झाला. गणाची आरक्षण सोडत निरीक्षण अधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी रजपूत यांच्या देखरेखीखाली, तहसीलदार परिक्षित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आली. सर्वसाधारण आरक्षण पडलेल्या कोंडकारूळ, पडवे, तळवळी, वेळणेश्वर चारी गणांच्या जागांवर सर्वच पक्षातून इच्छुक उमेदवारांची संख्या वाढत असल्याने या जागांवर अटीतटीची लढत होणार, हे निश्चित आहे.
जीवनशिक्षण शाळा नं. एकचा विद्यार्थी श्लोक तुळसुणकर याच्या हस्ते आरक्षण सोडत काढण्यात आली. पंचायत समिती गणाच्या आरक्षण सोडतीमध्ये पाचेरीसडा-नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री, शृंगारतळी-नागरिकांचा मागास प्रवर्ग, मळण-सर्वसाधारण स्त्री, शीर-सर्वसाधारण स्त्री, असगोली-सर्वसाधारण स्त्री, अंजनवेल-सर्वसाधारण स्त्री, कोंडकारूळ-सर्वसाधारण, पडवे-सर्वसाधारण, तळवली-अनारक्षित सर्वसाधारण, वेळणेश्वर- सर्वसाधारण असे आरक्षण पडले आहे.
दरम्यान, अनेक पंचायत समिती गणांमध्येमध्ये महिला आरक्षण पडल्याने विविध पक्षाच्या इच्छुक उमेदवारांचे पंचायत समिती सदस्य होण्याचे स्वप्न भंगले आहे. काही पंचायत समिती गणामध्ये स्त्री राखीव पडल्याने इच्छुक पदाधिकारी आतापासूनच महिलांचा शोध घेण्यास सुरवात केली आहे. असगोली व अंजनवेल गणामध्ये सर्वसाधारण स्त्री राखीव असल्याने या ठिकाणी सर्वच पक्षांना महिलांची शोधाशोध करावी लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar CM: बिहारचा नवा मुख्यमंत्री ठरला! 'या' नावावर शिक्कामोर्तब, अधिकृत घोषणा संध्याकाळी

Ayushman Bharat Scheme Update: आयुष्मान भारत योजनेत मोठा बदल! मोदी सरकारमुळे मिळणार ₹10 लाखांपर्यंत मोफत उपचार

IPL 2026: 'भारतात यशस्वी ठरलेल्या लोकांकडून शिकतोय अन् नोट्स घेतोय...' पंजाबच्या मॅचविनरने उघड केलं यशाचं गुपित

Maoist Song Dance Pune: पुण्यातील वसतिगृहात माओवादी आशय असलेल्या गाण्यावर नृत्य; Video Viral

SBI Whatsapp : स्टेट बँकेत अकाऊंट आहे? तुमच्यासाठी मोठी खुशखबर; घरबसल्या व्हॉट्सॲपवर होणार सगळं काम, पाहा काय आहे नवी सुविधा

SCROLL FOR NEXT