कोकण

वेंगुर्लेत जुन्या नेत्यांना नव्या संधी

CD

98332

वेंगुर्लेत जुन्या नेत्यांना नव्या संधी

वेंगुर्ले, ता. १३ ः येथील पंचायत समितीच्या होणाऱ्या निवडणुकीसाठी सदस्य पदांची आरक्षण सोडत आज तहसीलदार कार्यालय येथे जाहीर झाली. निवडणूक आयोगाच्या परिपत्रकानुसार या आरक्षण सोडतीमध्ये जुन्या आरक्षणांचा विचार न केला गेल्याने सर्वच ठिकाणी नवीन आरक्षण जाहीर झाली. यामुळे अनेक इच्छुकांची नाराजी झाली तर अनेकांना पुन्हा संधी चालून आली आहे.
आज जाहीर झालेल्या या आरक्षणमध्ये म्हापण, परुळे, आसोली व आडेली या पंचायत समिती मतदार संघात सर्वसाधारण आरक्षण जाहीर झाले आहे. वायंगणी, रेडी, शिरोडा, उभादांडा या पंचायत समिती मतदार संघासाठी सर्वसाधारण महिला आरक्षण जाहीर झाले आहे. तुळस मतदार संघासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला व मातोंड मतदार संघासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग अशी आरक्षण जाहीर झाली आहेत. शाळकरी मुलांच्या हस्ते चिठ्या काढून आरक्षण जाहीर करण्यात आले. या आरक्षण सोडतीवेळी भाजपा तालुकाध्यक्ष विष्णु उर्फ पप्पू परब, शिवसेना तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, माजी पंचायत समिती उपसभापती सिद्धेश परब, भाजपा तालुका चिटणीस समिर कुडाळकर, पालकरवाडी सरपंच बंड्या पाटील, वायंगणी सरपंच अवी दुतोंडकर, केळूस सरपंच योगेश शेटये, आरवली सरपंच समिर कांबळी, भाजपाचे शक्तीकेंद्र प्रमुख कमलेश गावडे, सुभाष सावंत, प्रसाद पाटकर, भूषण सारंग, सुधीर धुरी, मातोंड ग्रामपंचायत सदस्य विशाल बागायतकर, दिपेश परब, तुळस ग्रामपंचायत सदस्य जयवंत तुळसकर, सायमन आल्मेडा, वैभव होडावडेकर आदी उपस्थित होते.
---------------
जि.प.साठी सर्वच जागा सर्वसाधारण
वेंगुर्ले तालुक्यात जिल्हा परिषद मतदार संघाचा विचार करता सर्वच जागांवर सर्वसाधारण आरक्षण जाहीर झाले आहेत. यात तुळस व म्हापण जिल्हा परिषद महिलांसाठी राखीव झाला आहे. यामुळे वेंगुर्ला तालुक्यात अनेक इच्छुक पाहायला मिळणार आहेत. तालुक्यात ५ जिल्हा परिषद मतदार संघातील तुळस व म्हापणमध्ये सर्वसाधारण महिला तर आडेली, रेडी, उभादांडा मतदार संघासाठी सर्वसाधरण आरक्षण जाहीर झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maoist Song Dance Pune: पुण्यातील वसतिगृहात माओवादी आशय असलेल्या गाण्यावर नृत्य; Video Viral

SBI Whatsapp : स्टेट बँकेत अकाऊंट आहे? तुमच्यासाठी मोठी खुशखबर; घरबसल्या व्हॉट्सॲपवर होणार सगळं काम, पाहा काय आहे नवी सुविधा

Latest Marathi News Update: नऱ्हे येथे पीएमपी बस अपघात; चालकाला फिट आल्याने बस कठड्यावर धडकली

स्वतः वाघ्या म्हणून काम केलं, महिलांचं शोषण जवळून पाहिलं; दिग्दर्शक अभिषेक जावीरने सांगितला 'फुला'चा थरार!

Beed News: परफेक्ट च्या शोधात अनेक जण रिजेक्ट; तरुणींच्या अटींमुळे तरुणांचे वय चालले वाढत; शेतकरी मुलांना नकारच

SCROLL FOR NEXT