कोकण

रिक्षा-डंपर धडकेत दोघेजण जखमी

CD

रिक्षा-डंपर धडकेत
दोघेजण जखमी
रत्नागिरी ः शहरानजीकच्या कदमवाडी-मजगांव रस्त्यावर अज्ञात डंपरचालकाने विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षाला धडक दिली. या अपघातात एका विद्यार्थ्यासह रिक्षाचालक जखमी झाला. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. विद्यार्थी रियान सावकार व रिक्षाचालक जाहिदअली अब्दुलरहिम धामस्कर (वय ५०, रा. मजगाव, रत्नागिरी) अशी जखमींची नावे आहेत. ही घटना सोमवारी (ता. १३) दुपारी चारच्या सुमारास मजगाव-कदमवाडी रस्त्यावर घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रिक्षाचालक जाहिदअली धामस्कर हे रिक्षातून (एमएच-०८-एक्यू-७१६८) विद्यार्थी शोएब सावकार, रियान सावकार, महमद पेवेकर यांना शहरातील मिस्त्री हायस्कूल येथून बसवून रत्नागिरी ते मजगाव असे जात असताना कदमवाडी-मजगाव येथे आले असता मजगावहून रत्नागिरी येणाऱ्या डंपरने रिक्षाला धडक दिली. या अपघातामध्ये रिक्षाचालक जाहिदअल्ली धामस्कर व रियान सावकार हे जखमी झाले. त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.
----------
जयगड पोलिसांची
मद्यविक्रीवर धाड
रत्नागिरी ः तालुक्यातील सड्येवाडी-जयगड येथे विनापरवाना हातभट्टी व विदेशी दारूविक्रीवर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत ३ हजार ६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जयगड पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. संकेत पद्माकर वाघधरे (वय ३२, रा. जयगड, सड्येवाडी, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. १२) सायंकाळी सहाच्या सुमारास सड्येवाडी येथे एका घराच्या आडोशाला निदर्शनास आली. पोलिसांनी केलेल्या कारवाईत संशयिताकडे २२ लिटर हातभट्टीची २ हजार २०० रुपयांची दारू व ८६० रुपयांच्या विदेशी मद्य सापडले. या प्रकरणी पोलिसशिपाई पी. डी. लोटणकर यांनी जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास जयगड पोलिस अंमलदार करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT