कोकण

सावंतवाडी नगराध्यक्षपदासाठी युवराज्ञी निवडणुकीत उतरणार

CD

98359

सावंतवाडी नगराध्यक्षपदासाठी
युवराज्ञी निवडणुकीत उतरणार

राजघराण्याकडून इच्छा; महायुतीच्या नेत्यांशी चर्चा

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १३ ः येथील नगराध्यक्ष निवडणुक लढवण्याची राजघराण्याकडून इच्छा व्यक्त केली आहे. युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत संस्थानचे युवराज लखमराजे भोंसले यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात महायुतीच्या नेत्यांशी बोलण सुरू असल्याचेही ते म्हणाले.
येथील राजवाड्यात राजघराण्याकडून आज पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी, राजेसाहेब खेमसावंत भोसले, राणीसाहेब शुभदादेवी भोसले, युवराज लखमराजे भोसले, युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले उपस्थित होत्या. युवराज लखमराजे म्हणाले, ३५ वर्षांपूर्वी शिवरामराजे भोसले आमदार होते. येथील नगराध्यक्ष निवडणुकीत महिला आरक्षण पडल्यामुळे शहराच्या राजकारणात उतरण्याचा विचार करत आहोत. याची उमेदवारी युवराज्ञी श्रद्धाराजे यांच्यासाठी आम्ही भाजप आणि युतीच्या नेत्यांकडे मागणार आहोत. तशी चर्चाही सुरू आहे. सावंतवाडीच्या जनतेने दिलेले प्रेम बघता पुन्हा या जनतेची सेवा करण्यासाठी आमचा प्रयत्न राहील. वरिष्ठ नेते याबाबतचा योग्य निर्णय घेतील अशी आशा आहे. माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांच्याशीही बोलणे झाले आहे. शहरात ते बरीच वर्षे नेतृत्व करत आहे. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीला सामोरे जाण्याची आमची इच्छा आहे.’’
युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले म्हणाल्या, ‘‘राजकारण माझं क्षेत्र नाही. मात्र, यात काम करण्याची इच्छा आहे. शहराचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी प्रयत्न करायचे आहेत. इथली परंपरा जपण्यासाठी माझा प्रयत्न राहील. मी सावंतवाडीकर आहे, याचा अभिमान वाटतो. माझा प्रयत्न सावंतवाडीस ग्लोबल स्तरावर नेण्याचा राहणार आहे. पर्यटन वाढीसाठी माझा प्रयत्न असेल.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Airport: दिल्ली विमानतळावर थरारक क्षण! दोन विमानांच्या पंख्याची धडक, काही सेकंदांत वाचले शेकडो जीव

भारतातील नवीन ग्रॅज्युएट्ससाठी AI स्पेशलिस्ट' अन् 'कंटेंट क्रिएटर' ठरतायेत टॉप करिअर ट्रेंड्स! LinkedIn ‘Grads Guide 2026’ अहवाल

Pali News : प्रवाशांचे हाल थांबणार! सर्व अडथळे दूर करत रोहा-पुणे एसटी अखेर बसस्थानकात दाखल

Who is Navnita Gautam? विराट कोहली, स्मृती मानधना यांना 'फिट' ठेवणारी नवनीता गौतम; RCB ने तिच्यासाठी घेतलेला ऐतिहासिक निर्णय

Latest Marathi News Live Update : हरिवंश यांची राज्यसभेचे उपसभापती म्हणून निवड केली जाईल

SCROLL FOR NEXT