at14p12.jpg-
98469
रत्नागिरी : राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेली सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट हायस्कूलच्या आद्या कवितकेचा सन्मान करण्यात आला.
राज्य, विभागीय स्पर्धांमध्ये
सेक्रेड हार्टची धडक
आद्या कवितकेची राज्यस्तरावर भरारी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १४ : युवा सेवा संचालनालय, रत्नागिरी जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय यांच्यावतीने आयोजित विविध क्रीडा स्पर्धांमध्ये रत्नागिरीतील सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट हायस्कूलमधील मुलांनी उज्ज्वल यश मिळविले. त्यात तायक्वाँदो स्पर्धेत १९ वर्षांखालील गटात आद्या कवितके ही राज्य स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे. तिने विभागीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला.
रत्नागिरी तालुका व जिल्हा स्पर्धेत विविध खेळांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यात तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत १४ वर्षांखालील गटात सिया रेडीज, ऐशनी विचारे, साची जाधव, ऐश्वर्या सावंत, उर्वी थूळ यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला. जिल्हास्तरीय शालेय जलतरण स्पर्धेत १४ वर्षांखालील गटात आद्या कवितके हिने प्रथम क्रमांक, तर अर्चित कनगुटकर याने तृतीय क्रमांक पटकावला. जिल्हास्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेत १९ वर्षांखालील मुलींच्या गटात त्रिशा शितप हिने प्रथम क्रमांक मिळवला. १७ वर्षांखालील मुलांच्या गटात सार्थक देसाई (एअर पिस्टल) याने तृतीय क्रमांक मिळवला. त्यांची शालेय विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. जिल्हास्तरीय शालेय बास्केटबॉल स्पर्धेत १४ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिल्ह्यामध्ये द्वितीय क्रमांक, तर १७ वर्षांखालील गटात मुलांच्या संघाने तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.
जिल्हास्तरीय शालेय रोलर स्केटिंग स्पर्धेत १४ वर्षांखालील मुलींच्या गटात ऐश्वर्या सावंत हिने प्रथम, तर १७ वर्षांखालील गटात मुलांच्या गटात ध्रुव बसणकर आणि मुलींच्या गटात रिझा सुवर्णदुर्गकर या दोघांनी प्रथम क्रमांक मिळवला. तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत १७ वर्षे गटात इशिका सावंत हिने ४०० मीटर धावणे प्रकारात द्वितीय प्राप्त केला. जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत १४ वर्षे मुलांच्या गटात अरहान सोलकर याने प्रथम क्रमांक मिळवला.
चौकट
वेशभूषा स्पर्धेत प्रथम
लायन्स क्लबतर्फे क्रांती दिनानिमित्त आयोजित स्पर्धेमध्ये शाळेतील एनसीसी युनिटमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यात त्यांनी वेशभूषा स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला. संचलन प्रकारात द्वितीय क्रमांक त्यानंतर घोषवाक्य स्पर्धेत तृतीय क्रमांक प्राप्त केला.