98509
शिंदे शिवसेना स्वबळावर लढण्यास सज्ज
सचिन वालावलकर ः युती, उमेदवारीचा निर्णय केसरकरांकडे
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. १४ ः आगामी होणाऱ्या नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांत वेंगुर्लेत आमची स्वबळाची पूर्ण तयारी आहे. नगराध्यक्षांसह वीसही सक्षम उमेदवार, ५ जिल्हा परिषद व १० पंचायत समितीवर उमेदवार उभे करण्याची शिवसेनेची पूर्ण ताकद आहे; मात्र युतीबाबत व शिंदे शिवसेनेचे उमेदवार ठरविण्याचे सर्व अधिकार आमदार दीपक केसरकर यांचे आहेत. त्यांचा निर्णय अंतिम असेल, असे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांनी येथे आयोजित सभेत सांगितले.
वेंगुर्ले तालुका शिवसेनेची मासिक सभा ‘सप्तसागर कॉम्प्लेक्स’मधील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात झाली. यावेळी तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, शहरप्रमुख उमेश येरम, युवासेनेचे जिल्हाप्रमुख हर्षद डेरे, कोस्टल विभागाचे तालुकाप्रमुख काशिनाथ नार्वेकर, उपजिल्हाप्रमुख सुहास कोळसुलकर, युवासेना तालुका प्रमुख स्वप्नील गावड़े, महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख शीतल साळगावकर, तालुका महिला संघटक दिशा शेटकर, शहर महिला संघटक अॅड. श्रद्धा बाविसकर, उपतालुकाप्रमुख कौशिक परब, रवी पेडणेकर, विभागप्रमुख दत्ता साळगावकर, संजय परब, मितेश परब, अमित गावडे, युवतीसेना तालुका संघटिका योगिता कडुलकर-धुरी, आबा कोचरेकर, सुधीर धुरी, संतोष परब आदी उपस्थित होते.
वालावलकर म्हणाले, ‘‘राज्यात व केंद्रात भाजप, शिवसेना, अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षांच्या युतीची सत्ता आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्येही युती करावी की स्वबळावर लढायचे, याचे निर्णय वरिष्ठ नेते घेणार आहेत. स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय झाल्यास आम्ही पूर्णपणे तयार आहोत. निवडणुकांचा काळ असल्यामुळे आपल्या पक्षाला कमजोर करण्यासाठी विरोधक अफवा पसरवतील, त्यामुळे आता दक्ष राहणे गरजेजे आहे. आमदार केसरकर जे उमेदवार निवडतील, तो निवडून येण्यासाठी सर्वांनी १०० टक्के काम करण्याची मानसिकता तयार करा.’’
आगामी निवडणुकांमध्ये या इच्छुक उमेदवारांचे प्रस्ताव आमदार केसरकर व जिल्हाप्रमुख संजू परब यांच्यासमोर ठेवण्यात येतील. तालुक्यात शिवसेनेची ताकद आहे. त्यामुळे सर्वच पदाधिकारी व शिवसैनिकांनी कामाला लागावे. आपली ताकद कुठेही कमी पडता नये, असे तालुकाप्रमुख मांजरेकर यांनी सांगितले. विधानसभेला संघटनात्मक काम झाल्यामुळे केसरकर यांना यश मिळाले. आता नगरपालिकेवर भगवा फडकला पाहिजे, यासाठी आमचे १०० टक्के प्रयत्न असतील, असे शहरप्रमुख येरम यांनी सांगितले. अॅड. श्रद्धा परब-बाविस्कर यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.