rat14p14.jpg-
98471
चिपळूण : शिवचरित्रकार विजयराव देशमुख यांनी लोटिस्माला भेट दिली.
----------
शिवचरित्रकार विजयराव देशमुखांची लोटिस्माला भेट
चिपळूण, ता. १४ : थोर इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार विजयराव देशमुख यांनी लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराला भेट दिली. पत्रभेट दिवाळी अंकाच्या प्रकाशनासाठी महाराज चिपळूणला आले होते. लोटिस्माच्या वतीने कार्याध्यक्ष अरुण इंगवले यांनी त्यांना ग्रंथालयाला भेट देण्याची विनंती केली. त्यानुसार त्यांनी भेट दिली.
सहकार्यवाह विनायक ओक यांनी त्यांचे स्वागत केले. प्रकृती फारशी बरी नसतानाही त्यांनी प्रत्येक वस्तू आणि तिचा इतिहास जाणून घेतला. त्यानंतर बाळशास्त्री जांभेकर सभागृहातील तैलचित्रे पाहिली. संस्थेचे कार्याध्यक्ष इंगवले यांनी संस्थेच्यावतीने उपरणे देऊन व विनायक ओक यांनी तेजशलाका हा ग्रंथ देऊन सद्गुरूंचा सत्कार केला. कार्याध्यक्ष इंगवले यांनी देशमुख यांनी लिहिलेल्या शिवचरित्राच्या शेवटी दिलेली परिशिष्टे यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला व या परिशिष्टांमुळेच हे शिवचरित्र अक्षरधन झाल्याचे सांगितले. यावेळी अर्चना बक्षी आदी उपस्थित होते.