लोगो ः ‘शाळा तिथे दाखला’ उपक्रम
---
हजारो विद्यार्थ्यांच्या दाखल्यांचा प्रश्न निकाली
जिल्ह्यात ५४९९४ जणांना ‘वय अधिवास’, ७,७४२ जणांना जातीचे दाखले
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १४ ः जिल्ह्यात १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत सेवा पंधरवडा अभियान अंतर्गत शाळा तिथे दाखला हा उपक्रम राबविण्यात आला होता. या माध्यमातून शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांपैकी ५४ हजार ९९४ विद्यार्थ्यांचा वय अधिवास दाखल्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटला आहे. तसेच ७ हजार ७४२ विद्यार्थ्यांचा जातीचा दाखल्याचा प्रश्नही निकाली निघाला आहे. या विद्यार्थ्यांना दाखल्यांचे वाटप करण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे आणि महात्मा गांधी यांच्या जयंती दिनाच्या औचित्य साधून १७ सप्टेंबरपासून प्रारंभ झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज महराजस्व अभियान अंतर्गत सेवा पंधरवडा अभियानाचा २ ऑक्टोबरला समारोप झाला. ''सेवा पंधरवडा'' अभियानाच्या यशस्वीतेसाठी जिल्ह्याच्या प्रत्येक यंत्रणेकडून स्वतंत्र नियोजन करण्यात आले होते. तीन टप्प्यात राबविण्यात येणाऱ्या सेवा पंधरवडा उपक्रमाच्या माध्यमातून रस्ते, घरे यांसह स्थानिक गरजा आणि भौगोलिक परिस्थिती लक्षात घेवून नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यावर भर देण्यात आला.
दरम्यान, शाळा आणि शिक्षक यांच्यावर विद्यार्थ्यांच्या दाखल्यासाठी आवश्यक कागदपत्र जमा करून ते ऑनलाईन दाखल करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. यात शाळा आणि शिक्षकांचे मौल्यवान योगदान लाभले आहे. जात प्रमाणपत्र आणि वय अधिवास अशा दोन दाखल्यांचा यात समावेश होता. यातील वय अधिवास दाखल्यांसाठी तब्बल ५५ हजार ४६ एवढे प्रस्ताव आले होते. त्यातील ५४ हजार ९९४ दाखल्यांचे वितरण झाले आहे. उद्दिष्टांच्या ९९.९१ टक्के काम झाले आहे. विशेष म्हणजे दोडामार्ग तालुका वगळता सर्वच तहसील कार्यालयांनी आलेल्या प्रस्तावाचे १०० टक्के दाखल्यांचे वाटप केले आहे. केवळ दोडामार्ग तालुक्यात ९८ टक्के काम झाले आहे. २६०० प्रस्ताव आले होते. त्यातील २५४८ दाखले वाटप १३ ऑक्टोबर पर्यंत पूर्ण झाले आहे. महसूल प्रशासनाने अभियान पातळीवर यासाठी विशेष प्रयत्न करून हा नावीन्यपूर्ण उपक्रम कमालीचा यशस्वी केला आहे. तब्बल ५४ हजार ९९४ विद्यार्थ्यांना वय अधिवास दाखल्यांचे वाटप केले आहे. यामुळे एवढ्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी, नोकरीसाठी किंवा अन्य कामासाठी वय अधिवास दाखल्यासाठी करावी लागणारी पळापळ थांबली आहे. याबाबत सर्वच स्तरातून समाधान व्यक्त होत आहे.
--------------
98536
जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्याचे कौतुक
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी शाळा तिथे दाखला हा नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला होता. विशेष म्हणजे राज्यात केवळ दोनच जिल्ह्यांनी हा उपक्रम राबविला. या उपक्रमाला जिल्ह्यातील नागरिकांतून मोठा प्रतिसाद लाभला. शिक्षण घेत असलेले विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांच्यासाठी हा दिलासा देणारा उपक्रम असल्याने पूर्ण जिल्ह्याने उपक्रमाला डोक्यावर उचलून घेतले होते.
--
जात प्रमाणपत्र वाटपात मागे
शाळा तिथे दाखला या नावीन्यपूर्ण उपक्रम अंतर्गत एकीकडे वय अधिवास दाखला वितरणात १०० टक्के यश मिळालेले असताना जात प्रमाणपत्र वाटपात मात्र तेवढे समाधानकारक काम दिसत नाही. २२ हजार २५५ एवढे जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी विद्यार्थ्यांचे प्रस्ताव आले होते. त्यातील केवळ ७७४२ जातीच्या दाखल्यांचे वितरण झाले आहे. उद्दिष्टांच्या ३४.७९ टक्के हे काम झाले आहे. वस्तुतः वय अधिवास दाखले देण्याचे काम महसुलच्या अखत्यारीत आहे. परंतु, जातीचे दाखले देण्यासाठी वेगळी यंत्रणा आहे. त्यामुळे हे दाखले वितरण होण्यास विलंब लागत असल्याचे बोलले जात आहे. परंतु यासाठी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी जात पडताळणी समितीला विश्वासात घेऊन यात अभियान स्वरूपात काम करण्यास सांगितले तर यासाठी चांगले यश मिळू शकते.
-------------
शाळा तेथे दाखला अंतर्गत वाटप केलेल्या दाखल्यांचा दैनंदिन अहवाल
तालुका*जात प्रमाणपत्र*वाटप*वय, अधिवास प्रमाणपत्र*वाटप
दोडामार्ग*२२००*१४५३*२६००*२५४८
सावंतवाडी*४०२५*१४१०*१०७५८*१०७५८
वेंगुर्ला*२६५४*६७७*५१७६*५१७६
कुडाळ*३२५३*११३३*१०३५६*१०३५६
मालवण*१०२५*१०२५*६३१२*६३१२
कणकवली*३२९८*८०५*८८२५*८८२५
देवगड*४२६८*९४१*८८९६*८८९६
वैभववाडी*१५३२*२९८*२१२३*२१२३
एकूण*२२२५५*७७४२*५५०४६*५४९९४
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.