९८४४१
महिला आरोग्य जनजागृतीचा नवा आदर्श
मंडणगड तालुका ः ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अंतर्गत ६ हजार नागरिकांची तपासणी
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. १४ ः केंद्र व राज्यशासनाच्या सहकार्याने आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली मंडणगड तालुक्यात आरोग्य विभागामार्फत राबवण्यात आलेल्या स्वस्थ नारी, सशक्त परिवार या विशेष आरोग्य अभियानाला महिलांकडून आणि नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत झालेल्या या मोहिमेदरम्यान तब्बल ६ हजाराहून अधिक नागरिकांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला. महिला आरोग्य जनजागृतीचा नवा आदर्श तालुक्यातील आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी घालून दिला.
या अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट ग्रामीण व शहरी भागातील महिलांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे, मोफत तपासणीसह उपचार आणि समुपदेशन सेवा उपलब्ध करून देणे हे होते. तालुक्यातील २४ आरोग्य तपासणी शिबिरांमध्ये विशेषतः स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सूमन व्यास, डॉ. आशिष जाधव, नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. पिंपळकर, बालरोगतज्ज्ञ डॉ. साक्षी जाधव व डॉ. अक्षय पाटणकर यांसारख्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या सेवांचा लाभ नागरिकांना मिळाला.
या मोहिमेत महिलांसाठी स्तन व गर्भाशय मूख कर्करोग तपासणी, रक्तदाब व मधुमेह निदान, रक्तातील हिमोग्लोबिन तपासणी तसेच असंसर्गजन्य आजार, क्षयरोग तपासणी, गर्भवतींसाठी प्रसूतीपूर्व काळजी आणि मासिक पाळी स्वच्छतेबाबत जनजागृती अशा विविध सेवा देण्यात आल्या तसेच अवयवदान प्रबोधन, रक्तदान मोहीम, नेत्रतपासणी आणि आयुष्मान भारत कार्ड वाटपसारख्या सामाजिक उपक्रमांनीही लोकांना आकर्षित केले. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिषेक गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, ग्रामपंचायती, स्थानिक संस्था, खासगी आरोग्यसंस्था आणि शिक्षण विभाग यांच्या प्रभावी समन्वयातून ही मोहीम यशस्वीरित्या राबवण्यात आली.
चौकट
महत्त्वपूर्ण तपासण्या...
उच्च रक्तदाब तपासणी - ३३१
मधुमेह तपासणी - ३७२८
कर्करोग तपासणी - ४५३३
मूख कर्करोग - २०५६
स्तन कर्करोग - १११९
गर्भाशय मुख कर्करोग - १३५८
रक्तक्षय तपासणी - १३७३
गर्भवतींची एनसी तपासणी - १५२
किशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळी स्वच्छता व समुपदेशन - १०३३
लसीकरण लाभार्थी (मुले) - ११३
आयुष्मान भारत / वय वंदन कार्ड वाटप - १७०७ नागरिक
रक्तदाता नोंदणी - ३७ नागरिक
कोट
या अभियानातून महिलांमध्ये आरोग्य तपासणीबाबत जागरूकता वाढली, आजारांचे लवकर निदान झाले आणि कुटुंबांचे आरोग्य बळकट करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले.
- डॉ. अभिषेक गावंडे, तालुका आरोग्य अधिकारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.