सावंतवाडीत शुक्रवारी
‘करिअर कौन्सिलिंग’
सिंधुदुर्गनगरी ः लेप्टनंट कर्नल रत्नेश सिन्हा (नि.), कमांडंट, सैनिक स्कूल, यशवंतराव भोसले मिलिटरी स्कूल सावंतवाडी यांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयास पत्रान्वये कळविले आहे. सावंतवाडी येथे लवकरच सैनिक स्कूलची स्थापना होणार आहे. त्याकरिता शुक्रवारी (ता. १७) सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत भोसले नॉलेज सिटी, चराठे (वझरवाडी) येथे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सेवारत व माजी सैनिकांच्या पाल्यांसाठी सैनिक स्कूल प्रवेशासाठी करिअर कौन्सिलिंग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील इच्छुक सेवारत सैनिक व माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी, वीरनारी यांनी या संधीचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी लेप्टनंट कर्नल रत्नेश सिन्हा (नि.), कमांडंट, सैनिक स्कूल, यशवंतराव भोसले मिलिटरी स्कूल सावंतवाडी येथे संपर्क करावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी केले आहे.
...................
बांधकाम विभागाची
आज मासिक सभा
सिंधुदुर्गनगरी ः जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या समितीची मासिक सर्वसाधारण सभा उद्या (ता. १५) दुपारी ५.४५ वाजता मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी महाराज सभागृह येथे आयोजित केली आहे, अशी माहिती बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र सावंत यांनी दिली.
....................