कोकण

राज्यातील किरकोळ औषध विक्रेत्यांवर केले जातेय लक्ष्य

CD

किरकोळ औषधविक्रेते होतात लक्ष्य
दोन संघटनांचा आरोप ; कारवाई थांबविण्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १६ : मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये दूषित खोकल्याच्या सिरपमुळे २० मुलांचा मृत्यू झाला होता; परंतु या घटनेचा फटका महाराष्ट्रात किरकोळ औषधविक्रेत्यांना लक्ष्य करण्यात येत असल्याचा आरोप ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट्स अँड ड्रगिस्ट्स आणि महाराष्ट्र स्टेट केमिस्ट्स अँड ड्रगिस्ट्स असोसिएशनने केला आहे.
औषध नियंत्रक महासंचालनालयाने मुलांना खोकल्याचे सिरप देऊ नये, अशी सूचना जारी केली; पण लगेचच महाराष्ट्र एफडीएने अचानक तपासणी मोहीम राबवून औषधविक्रेत्यांचे परवाने निलंबित केले. या कारवाईबाबत संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. रत्नागिरी जिल्हा केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष अप्पासाहेब शिंदे आणि सचिव अनिल नावंदर यांनी व मुंबई झोनचे अध्यक्ष नंदू गोंधळी, उपाध्यक्ष उन्मेष शिंदे व सचिव वैभव कोकाटे यांनी या संबंधी प्रसिद्धिपत्र जारी केले आहे.
दोन्ही संघटनांनी म्हटले आहे की, मध्यप्रदेश आणि राजस्थानमधील मुलांचा मृत्यू हा औद्योगिक दर्जाच्या डायथिलिन ग्लायकॉल या विषारी रसायनामुळे झाला. हे रसायन काही सिरपमध्ये गोडवा आणण्यासाठी वापरले जात असल्याचे समोर आले आहे. ही दुर्घटना औषध उत्पादकांच्या निष्काळजीपणाचे परिणाम असून, किरकोळ औषधविक्रेत्यांचा या घटनेशी काहीही संबंध नाही. १९३७ पासून अशा घटना जगभरात वेळोवेळी घडल्या असून, औषध उत्पादकांनी गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस, गुड लॅबोरेटरीज प्रॅक्टिसेस आणि क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टिम यांचे पालन करणे आवश्यक आहे. ऑनलाइन फार्मसी आणि काही डॉक्टरांकडे मोठ्या प्रमाणात औषधसाठा असूनही त्यांच्यावर कारवाई होत नसल्याकडेही संघटनांनी लक्ष वेधले आहे. या अन्यायकारक कारवाया थांबवाव्यात, अशी मागणी संघटनांनी राज्य सरकार, एफडीए आयुक्त आणि डीसीजीआय यांच्याकडे केली आहे.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

स्मृती मानधना - पलाश मुच्छलचं लग्न रद्द, स्वत:च सोशल मीडियावर पोस्ट करत दिली माहिती; म्हणाली...

Goa Night Club Fire Incident : गोव्यातील सिलिंडर स्फोट प्रकरणी मोठी कारवाई ! नाईट क्लब मालकाला अटक, आतापर्यंत २५ जणांचा मृत्यू

Viral Video: भक्त हत्तीणीवर अभिषेकासाठी पाण्याचा वर्षाव करत होते, एका कर्मचाऱ्याने थांबवलं तर हत्तीणीने उचलून फेकलं!

Latest Marathi News Live Update : "इंडिगोच्या मक्तेदारीला परवानगी देणाऱ्या सरकारचे हे अपयश नाही का?..."- पवन खेरा

Sharad Pawar: ‘आघाडी’चे सर्वाधिकार पवारांना! राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बैठकीत निर्णय

SCROLL FOR NEXT