कोकण

वसुंधरा पायी दिंडी कणकवलीतून नाणीजधामकडे

CD

98901
‘वसुंधरा पायी दिंडी’ कणकवलीतून नाणीजधामकडे

सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. १६ : पर्यावरण रक्षण आणि वृक्षसंवर्धनाचा संदेश देत सिंधुदुर्गात आलेल्‍या ‘वसुंधरा पायी दिंडी’चे आज कणकवलीतून प्रस्थान झाले. २१ ऑक्‍टोबरला ही दिंडी नाणीजधाम येथे पोहोचणार आहे.
गोवा उपपीठ येथून १० ऑक्‍टोबरला ‘वसुंधरा पायी दिंडी’ निघाली आहे. त्‍यानंतर बुधवारी (ता.१५) ही दिंडी कणकवलीत दाखल झाली. येथील चौंडेश्‍वरी मंदिरात मुक्‍काम केल्‍यानंतर आज ही दिंडी तळेरेच्या दिशेने रवाना झाली. या दिंडीचे कणकवलीत आगमन आणि प्रस्थान होत असताना ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. काल सायंकाळी कणकवली तालुक्‍यात जोरदार पाऊस झाला. मात्र, या पावसाची तमा न करता दिंडी नियोजित वेळापत्रकानुसार सायंकाळी कणकवलीतील चौंडेश्‍वरी मंदिरात दाखल झाली.
जगद्‌गुरू रामानंदाचार्य दक्षिणपीठ नाणीजधाम यांच्यातर्फे ‘वसुंधरा पायी दिंडी २०२५’ हा उपक्रम राबवला जात आहे. राज्‍यभरातून नाणीज येथे वसुंधरा पायी दिंडी निघाल्‍या आहेत. यात गोवा उपपीठ येथून मुख्यपीठ श्रीक्षेत्र नाणीजधाम (रत्नागिरी) पर्यंत निघालेली दिंडी काल कणकवलीत दाखल झाली होती. आज तळेरे येथे मुक्‍कामानंतर उद्या (ता.१७) पुढील प्रवासाला निघणार आहे. या दिंडीमध्ये भाविकांच्या सोयीसाठी खाणे-पिणे, राहणे, स्वच्छतागृहांची व्यवस्था आहे. तसेच मागे कचरा राहणार नाही, याचीही दक्षता दिंडीतील स्वयंसेवक घेत आहेत. जगद्‌गुरू नरेंद्राचार्यजी यांच्या २१ ऑक्टोबर २०२५ रोजी होणाऱ्या ५९ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने ही दिंडी नाणीजधाम येथे दाखल होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivaji Kardile : भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांचे निधन, ६६ व्या वर्षी घेतला अंतिम श्वास

Manoj Jarange: बीडमध्ये होणारा ओबीसी मेळावा राष्ट्रवादी पुरस्कृत; मनोज जरांगे यांची टीका, राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींचा ऑक्टोबरचा हप्ता कधी जमा होणार? भाऊबीजेची ओवाळणी मिळणार?

Pro Kabaddi 2025: पराभवाची व्याजासह परतफेड! यू मुंबाचा तेलुगू टायटन्सवर दणदणीत विजय

Latest Marathi News Live Update : भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव कर्डीले यांचं निधन, वयाच्या ६६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

SCROLL FOR NEXT