कोकण

खेडमध्ये दिग्गज आऊट, नव्या चेहऱ्यांना संधी

CD

खेडमध्ये दिग्गज आऊट, नव्याना संधी
आरक्षणानंतर उलथापालथ; होममिनिस्टर्सना लॉटरी, इच्छुकांची भाऊगर्दी
सिद्धेश परशेट्ये ः सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. १७ : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी गट व गणांचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर खेड तालुक्यातील राजकीय समीकरणांमध्ये उलथापालथ झाली आहे. दिग्गजांचे सुरक्षित किल्ले डळमळले असून, नव्या चेहऱ्यांसाठी दारे खुली झाली आहेत.
खेड पंचायत समितीसह जिल्हा परिषदेचे आरक्षण नुकतेच जाहीर झाले आहे. त्यामध्ये जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती अरुण कदम यांच्यासह अनेक अनुभवी नेत्यांची कोंडी झाली आहे. दुसरीकडे शिवसेनेत इच्छुकांची भाऊगर्दी उसळली असून, अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीत दिग्गजांचे मनसुबे धुळीस मिळाले आहेत. तालुक्यात शिवसेना म्हणजे रामदास कदम असेच समीकरण आहे. सद्यःस्थितीत येथील राजकारण नवे वळण घेत असून, माजी आमदार संजय कदम यांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे सेनेची बाजू अधिक भक्कम झाली आहे. त्यामुळे तालुक्यात नव्या समीकरणांचा उगम होईल, असे चित्र पाहायला मिळत आहे. शिवसेनेच्या भात्यात नवे चेहरे असून, उबाठा सेनेला तगडे उमेदवार उभे करावे लागणार आहेत. त्यात आरक्षणामुळे दिग्गज आऊट, नवे इन अशी परिस्थिती तालुक्यात आहे. आरक्षणातील फेरबदलामुळे होममिनिस्टर्सची नावे पुढे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सक्षम महिला उमेदवारांच्या शोधात सर्वच पक्षात चाचपणी सुरू झाली असल्यामुळे येत्या काही दिवसात विविध पक्षात इन्कमिंग व आऊटगोइंग सुरू होणार आहे.
---
चौकट १
आरक्षणाचा फटका दिग्गजांना
* भडगाव गण : मागास प्रवर्गासाठी आरक्षण - माजी सभापती अरुण कदम यांचा पत्ता कट
* भरणे गण : मागास प्रवर्ग (स्त्री) साठी आरक्षित – नव्या महिला उमेदवाराची कसोटी
* सुकिवली, विराचीवाडी, लोटे गटांत सेनेची प्रतिष्ठा पणाला
* दयाळ सर्वसाधारण, धामणदेवी सर्वसाधारण स्त्री – दिग्गजांचे गण हातातून गेले.

चौकट २
सभापतिपदासाठी रस्सीखेच
भरणे गण सर्वसाधारण झाल्यामुळे इच्छुकांची भाऊगर्दी उसळली आहे. हा गण परंपरेने शिवसेनेसाठी सुरक्षित मानला जातो तर भडगाव गणदेखील दिग्गजांसाठी आकर्षण ठरत असून, सभापतिपदाच्या खुर्चीसाठी या दोन्ही गणात उमेदवारीसाठी रस्सीखेच होणार आहे.

चौकट ३
खाडीपट्ट्यात ठाकरे सेनेची कसोटी
माजी आमदार भास्कर जाधव यांना खाडीपट्ट्यात आपले अस्तित्व टिकवण्यासाठी कठीण संघर्ष करावा लागेल. कारण, हा भाग गुहागर विधानसभा मतदार संघात येतो. महाविकास आघाडीसमोरील आव्हान म्हणजे अंतर्गत मतभेद व आरक्षणामुळे निर्माण झालेला असंतोष होय. तसेच गुहागर मतदार संघातील बहिरवली, विराचीवाडी, गुणदे, लोटे, आंबडस, आंजणी, धामणदेवी या गणांमध्ये शिवसेना विरूद्ध उबाठा शिवसेना अशी थेट लढत होण्याची चिन्हे आहेत. महायुतीत तडजोडीचा फॉर्म्युला ठरवताना कुठे उमेदवार द्यायचा, कुठे सोडायचा यावर मोठे राजकीय गणित जुळणार आहे.
---
कोट १
महिला आरक्षणामुळे अनेक दिग्गजांचे पत्ते कट झाले आहेत. त्यामुळे महिला उमेदवार शोधताना सर्वच राजकीय पक्षांची कसरत होत आहे.
- अॅड. सैफ चौगुले, सामाजिक कार्यकर्ते
-------
कोट २
महायुती म्हणून एकत्र येत लढत झाली तर येणाऱ्या निवडणुकीत विजय निश्चित मिळेल; परंतु तरीदेखील विरोधकांना कमी लेखून जमणार नाही.
- सचिन धाडवे, तालुकाप्रमुख, शिवसेना (शिंदे गट)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात सात दिवस धोक्याचे! पावसाबाबत मोठी अपडेट समोर, हवामान विभागाकडून इशारा जारी

Lawrence Bishnoi: वेळीच स्वतःला सुधारा नाहीतर...; लॉरेन्स बिश्नोई टोळीला उघड इशारा, धमकी देणारा रोहित गोदरा नेमका कोण?

IND vs AUS: पहिला वनडे सामना हरूनही कर्णधार शुभमन गिल समाधानी; कारण सांगताना म्हणाला, 'या मॅचने आम्हाला...'

Pune Cyber Fraud : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने पुण्यातील व्यावसायिकाची दीड कोटींची फसवणूक

Diwali Get-Together Recipes: दिवाळी गेट-टुगेदरची मजा आणि शान वाढवा खास दुधी-अलमंड-हनी हलवा आणि कुरकुरीत छोले-कबाबसह!

SCROLL FOR NEXT