99397
वेंगुर्ले ः रंगीबेरंगी आकाशकंदिलांनी दुकाने सजली आहेत.
99398
वेंगुर्ले ः मातीच्या पणत्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
swt१८२६.jpg मध्ये फोटो आहे.
वेंगुर्ले ः भव्य नरकासुराच्या प्रतिमांवर शेवटचा हात फिरविण्यात तरुणाई गुंतली आहे.
वेंगुर्लेच्या बाजाराला ग्राहकांची प्रतीक्षा
दिवाळी खरेदी संथ; आज आठवडा बाजार, उलाढाल वाढण्याची आशा
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. १८ ः दिवाळी सणाला शुक्रवारपासून (ता. १७) प्रारंभ झाला. या सणाच्या पार्श्वभूमीवर विविध साहित्याने येथील बाजारपेठ सजली आहे. खास आकर्षण असलेल्या भव्य नरकासुराच्या प्रतिमांवर शेवटचा हात फिरविण्यात तरुणवर्ग गुंतला आहे. दुकानातील फराळासोबतच स्थानिक बचतगटांनी उत्पादित केलेल्या फराळाचेही स्टॉल लागले आहेत; मात्र बाजारपेठ सजली असली तरी ग्राहकांचा हवातसा प्रतिसाद पहायला मिळत नाही. वेंगुर्लेचा आठवडा बाजार उद्या (ता. १९) असल्याने यादिवशी उलाढाल होणार असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
गणेश चतुर्थीनंतर मोठा सण म्हणून दिवाळी सणाकडे पाहिले जाते. शुक्रवारपासून (ता. १७) या सणाला प्रारंभ झाला. सायंकाळच्या वेळी घरोघरी होणाऱ्या दीपोत्सवाने परिसर उजळून निघाला आहे. दिवाळी म्हटली की, फराळ हा मुख्य मानला जातो. महागाई कितीही वाढली तरी फराळामध्ये काही कमी पडू नये, याकडे महिलावर्गाचा कल असतो. धावपळीच्या जीवनात रेडीमेड फराळ घेण्याकडे कल वाढलेला दिसून येत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ऑनलाईन शॉपिंगद्वारे स्थानिक उत्पादित फराळ अगदी मुंबईसारख्या मोठ्या शहरात पाठविण्यात आला आहे. नवीन पिढी नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने व्यस्त असली तरी दैनंदिन कामातून वेळात वेळ काढत काही महिलांनी घरोघरी फराळ बनविला आहे.
दिवाळी सणात घरासमोर आकर्षक आकाशकंदील लावण्याची प्रथा आहे. यासाठी बाजारपेठेमध्ये विक्रीस आलेले रंगीबेरंगी आकर्षक असे आकाशकंदील पाहायला मिळत आहेत. शंभर रुपयांपासून आकाशकंदिलांची किंमत आहे. तसेच विविध पणत्या, मेणबत्या, रंगीबेरंगी रांगोळ्या, रांगोळ्यांचे साचे विक्रीस उपलब्ध झाले आहेत. अलिकडे चिनीमातीच्या पणत्या उपलब्ध असल्या तरी स्थानिक पातळीवर बनविलेल्या पणत्याही विक्रीस आल्या आहेत. गणेश चतुर्थीपेक्षा दिवाळीमध्ये फटाक्यांचा खप हा कमी असतो. असे असले तरी फटाक्यांचीही दुकाने मांडण्यात आली आहेत. दिवाळी सणामध्ये प्रामुख्याने गावठी पोह्यांचा समावेश असतो. गिरणीमध्ये पोहे काढण्यासाठी येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. त्यातही काही शेतकरी आपले भात पोह्यांसाठी आणत असल्याने बाजारात गावठी पोहे उपलब्ध होतात. यावर्षी १०० रुपये पायली असा दर गावठी पोह्यांचा आहे.
अलिकडे नरकचतुर्दशीच्या दिवशी नकरासुराच्या प्रतिमा दहन करण्याची ''क्रेझ'' वाढली आहे. त्यामुळे नवरात्रोत्सवानंतर युवाई वर्गासोबत लहान मुलेही नरकासुराची भव्यप्रतिमा करण्यात गुंतले आहेत. काही मुलांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले बनविण्याचा वसा घेतल्याने सर्वांना विविध किल्ले पाहता येणार आहे. युवा वर्गाच्या आणि मुलांच्या हस्तकलेला प्रोत्साहन देण्यासाठी सामाजिक संस्था आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी स्पर्धांचे आयोजन केले आहे. आपला नरकासुर तसेच आपण बनविलेला शिवाजी महाराजांचा किल्ला स्पर्धेमध्ये अव्वल ठरावा, यासाठी तरुणाई आणि लहान मुले रात्रंदिवस मेहनत घेत आहेत.
---
सर्वत्र दिवाळी सणाची लगबग
दिवाळी सणामध्ये लहान-मोठे दुकानदार आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी लक्ष्मीपूजन करतात. त्या पार्श्वभूमीवर दुकानांची स्वच्छता आणि रंगरंगोटी पूर्णत्वास आली आहे. दिवाळी सणाची लगबग अंगणातल्या तुलीशीवृंदावनापासून ते स्वयंपाकगृहापर्यंत पोहोचली आहे. नकरचतुर्दशीला पहाटे कारीट फोडून ‘गोविंदा रे गोपाळा’ अशी आरोळी देण्यासाठी तुलसीवृंदावन परिसर सुशोभित करण्याचेही काम सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.