कोकण

गांग्रईतील बिबट्यांचा ‘एआय खेळ’ उघड

CD

गांग्रईतील बिबट्यांचा
‘एआय खेळ’ उघड

वनविभागाने दिले स्पष्टीकरण
चिपळूण, ता. १८ : तालुक्यातील गांग्रई परिसरात चार बिबट्यांचा कळप मुक्तसंचार करत असल्याचे वृत्त समाजमाध्यमांवर वेगाने पसरले आणि एकच खळबळ उडाली; मात्र कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेले बिबट्याचे छायाचित्र प्रसारित झाल्याचे समोर आले आणि अनेकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
गेल्या आठ दिवसांपासून सोशल मीडियावर गांग्रई येथे चार बिबट्यांचा कळप दिसला, असा दावा करणारे व्हिडिओ आणि छायाचित्र मोठ्या प्रमाणावर प्रसारित केले जात होते. प्रत्यक्षात मात्र ते छायाचित्र एआयच्या सहाय्याने तयार केले असून, परिसरातील नागरिक आणि वनविभागाकडे बिबट्या दिसल्याची कोणतीही नोंद नाही.
चिपळूण तालुक्यात बिबटे मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. काही दिवसांपूर्वी निर्व्हाळ येथे दुचाकीने जाणाऱ्या दोघांवर बिबट्याने हल्ला केला. कळंबट येथे मृतावस्थेत बिबट्या आढळून आला. शिरगाव तळसर येथील जंगलात पट्टेरी वाघाचे अस्तित्व समोर आले आहे. याचा गैरफायदा घेत गांग्रई गावच्या रस्त्यावर चार बिबट्यांचा कळप मुक्त संचार करत असल्याचा व्हिडिओ टाकण्यात आला. वनविभागापर्यंत याची माहिती भेटल्यानंतर परिक्षेत्र वनाधिकारी सर्वर खान यांनी ग्रामस्थांकडे चौकशी केली असता हा व्हिडिओ फेक असल्याचे समोर आले. अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत स्रोतांकडून माहिती घ्यावी. बिबट्या दिसल्यास त्वरित वनविभागाशी संपर्क साधावा; मात्र समाजमाध्यमांवर कोणतीही माहिती खात्री केल्याशिवाय प्रसारित करू नये, असे आवाहन खान यांनी केले.
---
कोट
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने बनावट छायाचित्र आणि ध्वनिचित्रफीत तयार करणे अतिशय सोपे झाले असून, त्यामुळे खोटी माहिती पसरवण्याचे प्रमाण वाढले आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाने जनजागृतीबरोबरच सायबर तपासणी अधिक मजबूत करणे गरजेचे आहे.
- सर्वर खान, परिक्षेत्र वनाधिकारी, चिपळूण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात सात दिवस धोक्याचे! पावसाबाबत मोठी अपडेट समोर, हवामान विभागाकडून इशारा जारी

Lawrence Bishnoi: वेळीच स्वतःला सुधारा नाहीतर...; लॉरेन्स बिश्नोई टोळीला उघड इशारा, धमकी देणारा रोहित गोदरा नेमका कोण?

IND vs AUS: पहिला वनडे सामना हरूनही कर्णधार शुभमन गिल समाधानी; कारण सांगताना म्हणाला, 'या मॅचने आम्हाला...'

Pune Cyber Fraud : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने पुण्यातील व्यावसायिकाची दीड कोटींची फसवणूक

Diwali Get-Together Recipes: दिवाळी गेट-टुगेदरची मजा आणि शान वाढवा खास दुधी-अलमंड-हनी हलवा आणि कुरकुरीत छोले-कबाबसह!

SCROLL FOR NEXT