99525
विद्यार्थ्यांनो, वाचाल तरच वाचाल!
संपदा भाट ः डॉ. कलाम यांना गुरामवाडी प्रशालेत वंदन
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १९ ः जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुरामवाडी येथे बॅ. नाथ पै सेवांगण कट्टा यांच्या वतीने भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी शिक्षिका संपदा भाट यांनी स्वागत केले. ‘वाचाल तर वाचाल’ या उक्तीचा अर्थ समजावून सांगताना त्यांनी मुलांना वाचनाचे महत्त्व पटवून दिले.
सेवांगणचे कार्याध्यक्ष किशोर शिरोडकर यांनी मुलांना मार्गदर्शन करताना, ‘रोज पुस्तके वाचणे ही काळाची गरज बनली आहे. वाचनाची गोडी लावणे ही मोठ्यांची जबाबदारी आहे. केवळ गोष्टींचीच नव्हे तर विविध विषयांवरील सोपी पुस्तकेही मुलांना द्यायला हवीत, असे सांगितले. सेवांगण गेली ५० वर्षे वाचनसंस्कृती वाढीसाठी प्रयत्नशील आहे. कट्टा येथील वाचनालयाचा सर्वांनी लाभ घ्यावा’, असे आवाहनही त्यांनी केले.
मुख्याध्यापिका अमिता भाबल यांनी आयुष्यातील आजचा वाचन प्रेरणा दिन विशेष आणि आनंददायी ठरल्याचे सांगत सेवांगणचे आभार मानले. दीपक भोगटे यांनी वाचनालयाच्या विविध उपक्रमांची माहिती देत मुलांना नियमित वाचनासाठी प्रवृत्त केले. कार्यक्रमाच्या निमित्ताने गौरी पाटील हिच्या वाढदिवसानिमित्त सर्व विद्यार्थ्यांना भेटवस्तू आणि खाऊचे वाटप केले. याबद्दल रश्मी पाटील यांचे आभार मानण्यात आले. यावेळी सार्थक गुराम, कार्तिक वडर, दुर्वा झोरे, प्रणित कुडाळकर, प्रतिक गोठणकर, सिद्धेश गोठणकर, प्राची खोत, देवांशी गोठणकर, मंथन घाडीगावकर आणि हर्ष चव्हाण या विद्यार्थ्यांनी अब्दुल कलाम, ग.दि. माडगुळकर, हवामान, पर्यावरण, मालवणी कविता आदी विषयांवरील पुस्तकांमधून उतारे वाचले. सर्व विद्यार्थ्यांना ‘साधना’चा दिवाळी अंक, राष्ट्रीय नेत्यांची पुस्तके, भेटवस्तू व खाऊ देण्यात आला. या कार्यक्रमास सेवांगणचे किशोर शिरोडकर, बापू तळावडेकर, मनोज काळसेकर, श्रीधर गोंधळी, मिनार म्हाडगुत, ग्रंथपाल मंगल पराडकर, तसेच अंगणवाडी सेविका जांभवडेकर, स्वाती राठोड, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष भिवा गोठणकर, उपाध्यक्षा सुपाली वडर आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.