नांदिवसे ग्रामपंचायतच्या
नवीन इमारतीचे उद्घाटन
चिपळूण : नांदिवसे येथील निर्मल ग्रुप ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचे उद्घाटन आमदार शेखर निकम आणि माजी आमदार सदानंद चव्हाण यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी आमदार निकम म्हणाले, ग्रामपंचायत ही ग्रामीण भागातील विकासाचा केंद्रबिंदू असून, नूतन इमारतीमुळे गावकारभार अधिक सक्षम आणि पारदर्शक होईल. या ठिकाणी ग्रामस्थांसाठी उत्तम सुविधा निर्माण होतील आणि सर्वसामान्यांच्या अडचणी सोडवण्यात वेग येईल, असे सांगितले. तसेच २०२१ च्या अतिवृष्टीत गावात अनेक ठिकाणी नुकसान झाले होते. पूल वाहून गेल्याने संपर्क तुटला होता. त्यानंतर पुलाचे काम मंजूर करून उद्घाटन झाले, तो क्षण आजही माझ्या लक्षात आहे, अशा आठवणी सर्वांपुढे मांडल्या. तर माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी मनोगतात गावात अनेक विकासकामे केल्याचे सांगितले.
------
देवरुख मातृमंदिरातील
मुलांची दिवाळी साजरी
संगमेश्वर ः तालुक्यातील देवरुख येथील मातृमंदिर संचलित प्रसाद बालक मंदिरातील १०० मुलांनी दिपोत्सवाचा आनंद घेतला. यावेळी फराळाचा आस्वाद घेत दिवाळी सण साजरा केला. कोकणच्या मदर तेरेसा म्हणून ओळख असलेल्या मावशी हळबे यांनी सुरु केलेली मातृमंदिर संस्था व त्यातून नवी पिढी घडवणे, चांगले संस्कार देणे यासाठी सुरु झालेले प्रसाद बालक मंदिर आजही नवी पिढी संस्कारक्षम बनवत आहे. या ठिकाणी १०० चिमुकली मुले बोबडे बोल बोलत नव्या प्रवाहासाठी सज्ज होत आहेत. दिवाळीनिमित्ताने हा परिसर रांगोळ्या, आकाशकंदिल, पणत्यांनी सजविण्यात आला आहे. नवीन वस्रालंकार लेवून चिमुकली मुले दिपोत्सवात रंगली होती. यावेळी मुख्याधिकारी प्रशांत भोसले, मातृमंदिरचे विनय पानवलकर, विलास कोळपे, आत्माराम मेस्री, शिक्षिका मिनल देसाई आदि उपस्थित होते.
------
वाशिष्ठी डेअरीकडून शेतकऱ्यांना
७८ लाख ५६ हजारांचा बोनस
चिपळूण ः वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे चेअरमन प्रशांत यादव यांनी २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी शेतकऱ्यांना एकूण ७८ लाख ५६ हजार ४४१ रुपयांचा दिवाळी बोनस शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला आहे. त्यामुळे केवळ व्यावसायिक दृष्टिकोन न ठेवता शेतकऱ्यांचे नेहमीच हीत जपून काम करणाऱ्या वाशिष्ठी मिल्क अॅण्ड मिल्क प्रॉडक्ट्स या दुग्ध प्रकल्पातर्फे यावर्षी दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिवाळीची भेट देण्यात आली आहे. कोकणातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक-अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्या संकल्पनेतून चिपळूण तालुक्यातील पिंपळी येथे वाशिष्ठी डेअरीचा प्रकल्प साकारण्यात आला.
------
देव धामापूर सप्रेवाडी शाळेला
मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीचे पत्र
संगमेश्वर ः छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतीला उजाळा मिळावा म्हणून जागतिक वारसाच्या वास्तू म्हणून प्रमाणित केलेल्या बारा दुर्गापैकी दीपावली सुट्टीत एखाद्या दुर्गची प्रतिकृती काढून त्यासोबत सेल्फी काढून अमृत दुर्गोत्सव २०२५ च्या वेबसाईटवर अपलोड करण्याचे आवाहन शासनातर्फे करण्यात आले होते. त्यानुसार संगमेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा देव धामापूर सप्रे वाडी या शाळेने किल्ले प्रतापगडाची प्रतिकृती साकारून सेल्फीने सहभाग नोंदवला. या शाळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीचे अभिनंदन पत्र प्राप्त झाले आहे. यानिमित्त मुख्याध्यापक अरुण जाधव, सहाय्यक शिक्षक सतीश वाकसे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सतीश सप्रे यांचे गटशिक्षणाधिकारी संगमेश्वर विजय परीट, तानाजी नाईक, केंद्र प्रमुख उज्वला धामणस्कर यांनी विशेष अभिनंदन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.