- rat२०p१२.jpg-
P२५N९९७९१
राजापूर ः मशीनच्या साह्याने भातझोडणी करताना शीळ येथील शेतकरी सुनिल गोंडाळ.
भातकापणीने भरले शेतशिवार
राजापुरातील चित्र ; रोगराईवर नियंत्रण, पेरण्या वेळेत
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २०ः मोसमी हंगामात पावसाचे सातत्य नसले तरीही यावर्षी भातलावणी वेळेमध्ये झाल्याने यंदा भातशेती चांगली होईल असा अंदाज आहे. पीक फुलोऱ्यात येणे आणि दाणे भरणे या कालावधीत रोगराई न पसरल्यामुळे उत्पादनही चांगले येणार आहे. सध्या भातकापणीची कामे वेगाने सुरू आहेत. त्यामुळे दिवाळी साजरी करता येणार नसली तरीही, दिवाळी सणात शेतशिवारांमध्ये काबाडकष्ट करतानाही शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान व्यक्त आहे.
यंदा भातलावणीच्या कालावधीत पावसाने दडी मारली होती. पेट्रोल-डिझेल पंपाच्या साह्याने शेतकऱ्यांनी भातलावणीची कामे उरकली. त्यानंतर काही काळात पावसामुळे रोपांची पुरेशी आणि चांगली वाढ झालेली नव्हती. परंतु पाणी उपलब्ध झाल्यामुळे भातशेती पुन्हा तरारली. पीक फुलोऱ्यात येणे अन् दाणे भरण्याच्या कालावधीत वातावरण पूरक राहिल्यामुळे यंदा उत्पादन चांगले राहील असे शेतकरी वर्ग सांगत आहे. भाताच्या लोंब्यांमध्ये दाण्यांचे प्रमाण समाधानकारक आहे. गणेशोत्सवात भातरोपं फुलोऱ्यावर आली होती. त्या काळात पडलेल्या पावसामुळे लोंब्यांमध्ये चिंब होण्याचे प्रमाण वाढेल अशी शक्यता होती. सुमारे पाच ते दहा टक्के चिंब राहिल्याने त्याचा मोठ फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागलेला नाही. नवरात्रोत्सवानंतर काही दिवस पाऊस पडला असला तरीही, गेल्या चार-पाच दिवसांपासून परतीच्या पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे भातकापणीच्या कामांची लगबग वाढली असून त्यातून शेतशिवार गजबजली आहेत. भातकापणीच्या या कामांमुळे शेतकऱ्यांची यावर्षी दिवाळी शेतातच साजरी होणार आहे. फुलोरा आणि दाणे भरण्याच्या कालावधीमध्ये पडलेल्या पावसामुळे भाताच्या कणसांमध्ये झालेले चिंब, किडीचा झालेला प्रादुर्भाव आणि रानटी प्राण्यांचा उपद्रव यांमुळे भातशेतीला नुकसानीचा तडाखा बसला आहे. यावर्षी हेक्टरी सरासरी ४ ते साडेचार हजार किलो भातशेतीमधून उत्पादन मिळेल अशी शक्यता आहे. दिवाळी सणात शेतशिवारांमध्ये भातकापणीच्या कामासाठी रखरखत्या उन्हात काबाडकष्ट करूनही यावर्षीच्या भातशेतीच्या समाधानकारक उत्पादनामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे.
--------
चौकट १
राजापूरातील सरासरी भात पीक उत्पादन
वर्ष* हेक्टरी सरासरी किलो उत्पादन
२०१८-१९* ४३८१.२७
२०१९-२०* ३७७३.०८
२०२०-२१* ४५०२.८९
२०२१-२२* ४०४१.८३
२०२२-२३* ४६९३.१८
२०२३-२४* ४५०२.०५
२०२४-२५* ४००० ते ४५००
--------
कोट
यावर्षी पावसात सातत्य नव्हते. तरीही वेळेमध्ये भातशेती झाली. भातामध्ये चिंब होण्याचे प्रमाणही तुलनेने कमी राहीले आहे. किडरोगाचा प्रादुर्भाव, वन्यप्राण्यांचा उपद्रव यामुळे नुकसान झाले. यावर्षी भातशेतीचे समाधानकारक उत्पादन आहे. त्यामुळे हेक्टरी सरासरी ४ हजार किलो पेक्षा अधिक भात उत्पादन राहील.
- राकेश शिंदे, शेतकरी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.