99827
धार्मिक उत्सवांमुळे समाज संघटित
ॲड. समीर गवाणकर ः मालवणात भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेस प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २० : आपल्या धर्मातील उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे करण्यावर भर द्यायला हवा, तरच आपला देश, समाज संघटित होईल आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्याला पुढे चांगले दिवस येतील; अन्यथा जाती-जातीमध्ये, प्रांता-प्रांतामध्ये, निरनिराळ्या भेदांमध्ये विभागले जाऊन शत्रू राष्ट्रे त्याचा गैरफायदा घेतील. त्यामुळे सर्वांनी सावध राहायला हवे, असे प्रतिपादन ॲड. समीर गवाणकर यांनी रविवारी (ता. १९) येथे केले. दरम्यान, भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेत नावीन्य मेस्त्री, प्रथमेश सामंत, निर्भया जाधव यांनी विविध गटांत प्रथम क्रमांक पटकावला.
येथील हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या वतीने रविवारी रात्री भरड नाका येथे भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेचे उद्घाटन पोलिस निरीक्षक मारुती जगताप यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी संयोजक प्रशांत हिंदळेकर, सहसंयोजक भाऊ सामंत, ॲड. समीर गवाणकर, सुदेश आचरेकर, महेश कांदळगावकर, दीपक पाटकर, बबन शिंदे, बंटी केनवडेकर, अमित खोत, अनिकेत फाटक, श्रीराज बादेकर, संदीप बोडवे, यतीन खोत, शिल्पा खोत, स्नेहा आचरेकर, स्मृती कांदळगावकर, भूषण साटम, आप्पा लुडबे यांच्यासह अन्य समिती सदस्य उपस्थित होते. प्रास्ताविक भाऊ सामंत यांनी केले.
पोलिस निरीक्षक जगताप यांनी हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या या उपक्रमाचे स्वागत करतानाच या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले. हा उपक्रम उत्तरोत्तर वाढत जावो, अशी सदिच्छाही त्यांनी व्यक्त केली.
स्पर्धेचा उर्वरित निकाल असा ः बालगट-हृदयांश फाटक, दक्ष मांजरेकर, उत्तेजनार्थ-अनुश्री मेस्त्री, अंश ढवाळी, हरमलकर ग्रुप, आसरा सातार्डेकर, विहान साळसकर. खुला गट पुरुष-हार्दिक परुळेकर, प्रसाद शिरोडकर. खुला गट महिला-रेवा जोशी, हर्षदा पाडगावकर, उत्तेजनार्थ-अश्विनी आचरेकर, सई कांबळी. विशेष प्राविण्य-अनिता आळवे, सुरेखा बिलये. परीक्षक म्हणून प्रफुल्ल देसाई, संजय शिंदे, शुभदा टिकम यांनी काम पाहिले.
सर्व विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम, चषक, प्रमाणपत्र तसेच सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेचे चषक उद्योजक भूषण साटम यांनी पुरस्कृत केले होते. पारितोषिक वितरण शिल्पा खोत, अन्वेशा आचरेकर, स्नेहा आचरेकर, स्मृती कांदळगावकर, महिमा मयेकर, तारका चव्हाण, सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, उद्योजक केदार झाड, मोहित झाड, राजू बिडये, संजय गावडे, मोहन वराडकर, ललित चव्हाण यांच्या उपस्थितीत झाले. स्पर्धा यशस्वीतेसाठी हरिश पडते, गणेश चव्हाण, प्रसाद हळदणकर, स्वप्नील घाडी, अमोल गावडे, शुभम मेस्त्री यांच्यासह हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या सर्व सदस्यांचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विनोद सातार्डेकर यांनी केले. स्पर्धा संपल्यानंतर प्रथम विजेत्या स्पर्धकांच्या हस्ते नरकासुर प्रतिमेचे दहन करत श्रीकृष्णाचा जयजयकार करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.