कोकण

चिपळूणात राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळाचा नारा

CD

चिपळूणात राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळाचा नारा
कार्यकर्त्यांची मागणी ; अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठींच्या कोर्टात
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २० ः आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. जर युती झाली नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) स्वबळावर निवडणूक लढवण्यास सज्ज आहे, असा ठाम निर्धार कार्यकर्त्यांनी काल (ता. १९) सावर्डे येथील बैठकीत केला.
महायुतीमधील अपेक्षित युती आणि वाटाघाटी निष्फळ ठरल्या, तर दोन्ही निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी ठेवावी असा आग्रह कार्यकर्त्यांनी बैठकीत धरला. मात्र वरिष्ठ नेते व पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो सर्वांनी मान्य करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. यावेळी आमदार शेखर निकम म्हणाले, महायुतीच्या माध्यमातून आपण तालुक्यात सर्वस्तरांवर विकासकामे केली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या तिघांनी मिळून कोकणासह संपूर्ण राज्यात जलदगतीने विकास घडवून आणला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आत्मविश्वास ठेवावा. वरून महायुतीबाबत सकारात्मक संकेत मिळाले आहेत आणि त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. मात्र जर कोणत्याही कारणास्तव युती न झाल्यास राष्ट्रवादी अजित पवार गट स्वबळावर लढेल, असा इशारा त्यांनी दिला.
सावर्डे येथील बैठकीला प्रांतिक उपाध्यक्ष शौकत मुकादम, सरचिटणीस जयंद्रथ खताते, तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे, रमेश राणे, दादा साळवी, विजय गुजर, सुरेश खापले, महिला जिल्हाध्यक्षा पूजा निकम, दिशा दाभोळकर, शहराध्यक्ष मिलींद कापडी, माजी सभापती सूर्यकांत खेतले, माजी सरपंच दशरथ दाभोळकर, दिलीप माटे, यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
----
चौकट
रिंगणात उमेदवार उतरवण्यास सज्ज
चिपळूण विधानसभा मतदारसंघात ९ जिल्हा परिषद गट आणि १८ पंचायत समिती गण आहेत. याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आपले उमेदवार उतरवू शकतात, असा निर्णय आमदार निकम यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत घेण्यात आला. मित्रपक्षांमधील महायुतीबाबत चर्चा सुरू असली तरीही आपली तयारी करूया असे निकम यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हॅप्पी दिवाळी! दिपिका-रणवीरने लेक 'दुआ'सोबत पहिल्यांदाच शेअर केला फोटो....

शेवटच्या ओव्हरमध्ये ४ धावा अन् सामना टाय... BAN vs WI सामन्यात ड्रामा; थरारक सुपर ओव्हरमध्ये लागला निकाल

Deglur ZP Elections : ग्रामीण भागात मिनी मंत्रालयाच्या निवडणुकीची धामधूम; शेतकऱ्यांच्या प्रश्नांना बगल

PESA Candidates Disqualification : पेसा भरतीतील २३ उमेदवारांचे भवितव्य धोक्यात; दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये कागदपत्रांची पूर्तता कशी करणार?

Kolhapur News : दिवाळीसाठी फटाके आणायला गेले, ते पुन्हा परतलेच नाहीत; ट्रकच्या धडकेत बहीण-भावासह पुतणीचा अपघाती मृत्यू...

SCROLL FOR NEXT