कोकण

माखजन विभागातील गट, गणात इच्छुकांची भाऊगर्दी

CD

माखजन विभागात इच्छुकांची भाऊगर्दी
राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक ; निवडीचे अधिकार आमदार निकमांकडे
सकाळ वृत्तसेवा
सावर्डे, ता. २१ : संगमेश्वर तालुक्याच्या उत्तरेकडील माखजन विभागात आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून (अजित पवार गट) इच्छुकांची भाऊगर्दी झाली आहे. त्यामुळे उमेदवारीचा निर्णय विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. सरंद (ता. संगमेश्वर) येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. त्यासाठीची तयारी वेगाने सुरू झाली आहे. उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांकडून प्रयत्न सुरू झालेले आहे. राजकिय पक्षांकडूनही आढावा बैठका सुरू आहेत. सरंद येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीला तालुकाध्यक्ष राजेंद्र पोमेंडकर उपस्थित होते. यामध्ये महायुतीचा उमेदवार निवडून आणण्याचा निर्धार करण्यात आला. माखजन विभागातील धामापूरतर्फे संगमेश्वर हा जिल्हा परिषद गट सर्वसाधारण तर आरवली पंचायत समिती गणात सर्वसाधारण महिला आणि धामापूर गणात सर्वसाधारण असे आरक्षण आहे. त्यामुळे इच्छुकांची संख्या वाढली आहे.
आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी महायुती झाली तरी आणि न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते पूर्ण तयारीनिशी निवडणुकीच्या मैदानात उतरतील असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
या बैठकीत तालुकाध्यक्ष राजेंद्र पोमेंडकर यांनी मागील निवडणुकीचा आढावा घेतला. यावेळी राजेंद्र पोमेंडकर, अल्पसंख्याक विभाग जिल्हाध्यक्ष जाकीर शेकासन, जिल्हा परिषद माजी सदस्य दीपक जाधव, पंचायत समितीचे माजी सदस्य नाना कांगणे, जिल्हा कार्याध्यक्ष सुशील भायजे, उपाध्यक्ष तुकाराम येडगे, तालुका उपाध्यक्ष गणपत चव्हाण, शशिकांत घाणेकर, शेखर उकार्ड, महेश बाष्टे आदींनी आपले विचार मांडले. या बैठकीत प्रचार संयोजन समिती निश्चित करण्यात आली.
-----
चौकट
वीस उमेदवार इच्छुक
धामापूर गणातून १२, आरवली गणातून ३ तर धामापूर जिल्हा परिषद गटातून ५ असे वीस जण निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याने ही सर्व नावे पार्लेमेंटरी बोर्डाकडे पाठविण्यात येतील, असे राजेंद्र पोमेंडकर यांनी सांगितले. तसेच पक्ष देईल त्या उमेदवाराला निवडून आणू असे सर्व कार्यकर्त्यांनी बैठकीत सांगितले. आमदार निकम जो उमेदवार ठरवतील तो, सर्वांना मान्य राहील असे उपस्थितांनी एकमतांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PORTUGAL VS UZBEKISTAN: ख्रिस्तियानो रोनाल्डोचे विक्रम, विक्रम, विक्रम... पोर्तुगालचा ५-० असा दणदणीत विजय, Fifa World Cup च्या बाद फेरीच्या दिशेने कूच

Cristiano Ronaldo Record: ६० वर्ष एकाच व्यक्तीच्या नावे होता विक्रम, रोनाल्डोने ३३ मिनिटांत मोडला! गोलरक्षकाला गंडवलं Video तुफान Viral.. मेस्सीही मागे पडला

Cristiano Ronaldo Record: "नाद करा, पण आमचा कुठं..." ख्रिस्तियानो रोनाल्डो आला अन् मैदान गाजवलं; रेकॉर्ड ब्रेकिंग गोल्स Video Viral

Cristiano Ronaldo Create History: अविश्वसनीय! रोनाल्डोचा विश्वविक्रम; World Cup मध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच, मेस्सीचाही विक्रम मोडला, Video

Tanker Mafia : नागरिकांची आर्थिक पिळवणूक! टँकरमाफियांना महापालिकेची फूस; अवाच्या सवा दराने पाण्याची विक्री

SCROLL FOR NEXT