कोकण

दापोली- दापोली विंटर सायक्लोथॉनमध्ये १६० स्पर्धक सहभागी

CD

rat२९p८.jpg-
०११५६
दापोली विंटर सायक्लोथॉन २०२५ या सायकल स्पर्धेत सहभागी झालेले स्पर्धक.

दापोली विंटर सायक्लोथॉनमध्ये १६० स्पर्धक सहभागी
सायकलिंग क्लब; समुद्रकिनाऱ्यावरून लुटला सायकल चालवण्याचा आनंद
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. २९ः दापोली सायकलिंग क्लबतर्फे आयोजित ‘दापोली विंटर सायक्लोथॉन २०२५’ या सायकल स्पर्धेत राज्यातील विविध भागांतील ७ ते ८० वर्षे वयोगटातील १६० स्पर्धक सहभागी झाले होते. समुद्रकिनाऱ्यावरील ५० किलोमीटरच्या रम्य मार्गावरून सायकल चालवताना स्पर्धकांनी कोकणातील निसर्गसौंदर्याचा मनमुराद आनंद घेतला.
सायक्लोथॉनमध्ये दापोली, उंबर्ले, ओळगाव, किन्हळ, देवके, बुरोंडी, लाडघर, कर्दे, मुरूड, सालदुरे आणि पाळंदे अशा समुद्रकिनाऱ्यावरील ५० किलोमीटरच्या रम्य मार्गावरून सायकलस्वारांनी कोकणातील निसर्गसौंदर्याचा मनमुराद आनंद घेतला. मार्गातील अनेक पर्यटनस्थळांना भेटी देत पारंपरिक कोकणी खाद्यपदार्थ व माशांचा आस्वाद घेतला. या स्पर्धेत ५० किमी किंगफिशर सिनिक रूट, २०० किमी शॉर्ट सिटी लूप तसेच फनराईड अशा विविध गटांचा समावेश होता. सर्व स्पर्धकांना पदक आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. या स्पर्धेतील विशेष आकर्षण ठरलेले पुण्याचे ८० वर्षीय गौतम भिंगानिया. त्यांनी दिल्ली–कोलकाता–पुणे असा ३ हजार ४४४ किमीचा सायकल प्रवास पूर्ण केला होता तसेच नॉर्थ केप ४ हजार या युरोपातील ८ देशांतून जाणाऱ्या स्पर्धेत विश्वनाथन् (पुणे) यांनी भाग घेतला. त्यांच्यासह विद्याधर पालकर, फिरोझ खान (पुणे) अनुभवी रायडर्सनीही सहभाग घेतला होता.
सायक्लोथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी मुंबईहून विठोबा चव्हाण आणि अजय सुर्वे यांनी एकाच दिवसात सायकलवरून मुंबई ते दापोली प्रवास केला. या सायक्लोथॉनच्या यशस्वी आयोजनासाठी दापोली शिक्षणसंस्था, तालुका आरोग्य अधिकारी व टीम, दापोली पोलिस, मेनेकी नुट्रिशन, राहुल मंडलिक आदींचे सहकार्य लाभले. नियोजनात अंबरिश गुरव, प्रशांत पालवणकर, राजेशकुमार कदम, राजेंद्र नाचरे आणि सुधीर चव्हाण यांनी मोलाची भूमिका बजावली. संपूर्ण स्पर्धेदरम्यान ‘सायकल संस्कृती वाढवा, पर्यावरण वाचवा,’ हा संदेश देत सायकलस्वारांनी दापोलीतील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले आणि सायक्लोथॉनच्या आठवणींनी समारोप झाला.

चौकट
छोटे सायकलपटू चमकले
‘किंगफिशर सिनिक रूट’ पूर्ण करणाऱ्यांमध्ये तन्मय नागपुरे (वय १०), दिशांत पवार (वय १२), अवधूत पाथे, वरद कदम, आयुष जोशी आणि पियुष पवार या छोट्या सायकलपटूंनी चमकदार कामगिरी केली तसेच ‘शॉर्ट सिटी लूप’ मार्गावर आयुष शिंदे आणि श्लोक मोहिते यांनी १०० किमी प्लस तर स्वराज राजपूरकर, प्रेम भुसारे, पार्थ पालटे, दीप कदम आणि आरूष इदाते यांनी ८० किमी प्लस सायकल चालवून उत्तम कामगिरी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Powai Kidnapper Encounter: पवई प्रकरणातील किडनॅपरचा एन्काऊंटर! छातीच्या डाव्या बाजूला गोळी लागली अन्..

Delhi Riots 2020 Update : ‘’अचानक नव्हता उफळला दिल्लीत हिंसाचार, सत्ता बदलण्यासाठीचा तो होता कट’’ ;पोलिसांचा दावा!

Rohit Arya News: नाराजी सरकारवर; पण माथेफिरूचा मुलांच्या जीवाशी खेळ, पडद्यामागची फिल्मी गोष्ट आली समोर

Sepsis Explained: ‘शिर्डी के साईबाबा’ फेम सुधीर दळवी जीवघेण्या सेप्सिसमुळे गंभीर; वाचा संपूर्ण माहिती एकाच क्लिकवर

Latest Marathi News Live Update : वादळामुळे गुजरातच्या बोटींनी भाईंदरच्या उत्तन किनाऱ्यावर घेतला आश्रय

SCROLL FOR NEXT