कोकण

मटण - मच्छीमार्केटच्या लिलावाला शून्य प्रतिसाद

CD

- RATCHL३१२.JPG -
२५O०१६४९
चिपळूण ः मटण व मच्छी मार्केटमधील गाळे.
---
मटण-मच्छीमार्केट लिलावाला शून्य प्रतिसाद
चिपळूण पालिकेपुढे पेच ; नूतनीकरणानंतरही ३० वर्षांसाठी गाळे घेणे जोखमीचे
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ३१ ः गेल्या अनेक वर्षापासून पडीक असलेली मटण व मच्छीमार्केटच्या इमारतीसाठी नूतनीकरणानंतर पालिका प्रशासनाने लिलाव प्रक्रिया राबवली; मात्र त्यास व्यावसायिकांनी शून्य प्रतिसाद दिला. या ई-लिलाव प्रक्रियेत एकाही व्यावसायिकाने सहभाग न घेतल्याने पालिका प्रशासनासमोर फेरलिलाव करण्याची वेळ आली आहे.
चिपळूण पालिकेने मच्छी-मटणमार्केट इमारतीची तात्पुरती डागडुजी करून गाळ्यांचा लिलाव जाहीर केला होता. ३० वर्षासाठी येथील ४३ गाळे भाड्याने देण्यात येणार आहेत. मटणमार्केटची इमारत २००९ मध्ये उभारण्यात आली; मात्र, बांधकाम झाल्यापासून अनेक गाळे वापरात आलेच नाहीत. २०२० मध्ये या इमारतीचे मूल्यांकन करून आवश्यक नूतनीकरण व सुविधा उपलब्ध करण्यासाठी ६२ लाखांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले होते. आवश्यक दुरूस्ती करत पालिकेने येथील ४३ गाळ्यांच्या ई-लिलाव प्रक्रियेला सुरुवात केली.
रस्ता सन्मुख असलेले १ ते १५ गाळ्यांपैकी अनुसूचित जाती-जमातीपैकी व भटक्या विमुक्त जाती-जमातीकरिता आणि दिव्यांग व्यक्तीकरिता प्रत्येकी १ असे २ गाळे आरक्षित ठेवले आहे. या गाळ्यांचे क्षेत्रफळ १४. ६२५ चौ. मी. असून, नापरतावा अनामत रक्कम २ लाख ७१ हजार ८९ रुपये भरावी लागणार आहे तर गाळ्यांचे मासिक भाडे ३६५० रुपये ठेवले आहे. मच्छीमार्केटच्या १ ते १० गाळ्यांमधील पहिला गाळा दिव्यांगासाठी आरक्षित ठेवला आहे. या गाळ्यांसाठी ना परतावा अनामत रक्कम २ लाख १७ हजार ५२३ रुपये आहे तर १ ते १८ मटणमार्केट गाळ्यांमधील १ गाळा आरक्षित आहे. या गाळ्यांसाठीदेखील मच्छीमार्केटप्रमाणेच अनामत रक्कम भरावी लागणार आहे. मटण व मच्छीमार्केटच्या गाळ्यांचे मासिक भाडे २९०० रुपये ठेवण्यात आले आहे. एकूण ३० वर्षासाठी हे गाळे ई-लिलाव प्रक्रियेतून भाड्याने देण्यात येणार आहे; मात्र याच दरम्यान मुकादम यांनी जाहिरात प्रसिद्ध करत येथील व्यावसायिकांनी या लिलाव प्रक्रियेत सहभागी होऊ नये, असे आवाहन केले होते. या लिलावाकडे व्यावसायिकांनी पाठ फिरवली.
..........
कोट
मटण-मच्छीमार्केटच्या इमारतीची दुरवस्था पाहता येथे पुढील ३० वर्षांसाठी गाळे भाडेतत्त्वावर घेणे व्यावसायिकांसाठी जोखमीचे व अडचणीचेच आहे. ही वस्तुस्थिती मी जनतेसमोर आणली होती. याचा विचार करूनच व्यावसायिक व नागरिकांनी या ई-लिलाव प्रक्रियेपासून लांब राहत त्यात सहभाग घेतला नाही.
- इनायत मुकादम, माजी नगरसेवक, चिपळूण.
..............
कोट
मटण व मच्छीमार्केटमधील गाळ्यांच्या लिलावापूर्वी पालिका प्रशासनाने संबंधित व्यावसायिकांची बैठक घेतली होती. त्याचवेळी लिलावात सहभागी होण्यासाठी सूचना केली होती. आवश्यक असलेली ‘की’ (kee) बहुतांशी व्यावसायिकांनी न काढल्याने त्यांना लिलावात सहभागी होता आले नाही. आता पुन्हा फेरलिलाव प्रक्रिया राबवतानाच व्यावसायिकांना मार्गदर्शन केले जाईल.

- मंगेश पेढांबकर, उपमुख्याधिकारी, चिपळूण पालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Financial Scam : अमेरिकेत मोठा आर्थिक घोटाळा! भारतीय वंशाच्या ‘CEO’वर तब्बल ४००० कोटींच्या फसवणुकीचा आरोप

Mumbai Local Megablock: महिन्याच्या पहिल्याच रविवारी खोळंबा, तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; अनेक लोकलवर परिणाम

Asian Youth Games 2025: चाळीतून उंच भरारी! पुण्याच्या चंद्रिकाने बहरीनमध्ये मुष्टियुद्धात सुवर्णपदकावर कोरले नाव

Purandar Airport : भूसंपादनासाठी हवे पाच हजार कोटी, प्रस्तावित पुरंदर विमानतळ; जिल्हाधिकारी डुडी यांची माहिती

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगडच्या प्रसिद्ध कलाकार पद्मविभूषण तीजनबाई यांच्या कुटुंबाशी संवाद साधला

SCROLL FOR NEXT