-rat४p१३.jpg-
P२५O०२४१६
राजेंद्र आयरे
----
बसपाचे प्रदेश सचिव
राजेंद्र आयरे यांचे निधन
रत्नागिरी, ता. ४ : बहुजन समाज पक्षाचे प्रदेश सचिव आणि समाजातील एक लढवय्या नेता म्हणून ओळखले जाणारे राजेंद्र लहू आयरे (वय ६९) यांचे हृदयविकाराने बदलापूर येथे दुपारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, तीन भाऊ, बहीण असा परिवार आहे.
शहरातील परटवणे, अशोकनगर (रत्नागिरी) येथील रहिवासी असलेले राजेंद्र आयरे यांनी दीर्घकाळ बहुजन समाज पक्षात सक्रिय कार्य केले. बहुजन चळवळीसाठी त्यांनी आयुष्य वाहून घेतले होते. काही दिवसांपूर्वी ते आपल्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी बदलापूर येथे गेले होते. तिथेच अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले. त्यांचा मृतदेह बदलापूर येथून रत्नागिरी येथे आणण्यात येणार असून, रात्री उशिरा अंत्यसंस्कार होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.