कोकण

रत्नागिरीतील एकाची ९३ हजारांची फसवणूक

CD

रत्नागिरीतील एकास
९३ हजारांचा गंडा
रत्नागिरी, ता. ४ ः सोशल मीडियाच्या व्हॉटस्अॅपवर आलेली लिंक ओपन करून त्यामध्ये माहिती भरली असता भामट्याने बॅंक खात्यातून ९३ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अनोळखीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी अजित सदानंद पिलणकर (वय ५०, रा. पुष्पेंद्र कॉम्प्लेक्स, शेरेनाका, झाडगाव-रत्नागिरी) असे ९३ हजाराची फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ही घटना २२ ते २५ सप्टेंबर २०२५ सायंकाळी साडेपाचच्या सुमारास रमाविठ्ठल अपार्टमेंट, राधाकृष्ण टॉकीजसमोर, रत्नागिरी येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी अजित पिलणकर २५ सप्टेंबरला सिनेमाच्या तिकीट बुकिंगबाबत माहिती घेत होते. त्याचवेळी त्यांच्या मोबाईलच्या व्हॉट्सअॅपवर आलेली लिंक ओपन करून माहिती भरली. त्यानंतर फिर्यादी यांच्या बँक खात्यातून सुरुवातीला ८ हजार व त्यानंतर ८५ हजार असे एकूण ९३ हजार रुपये वळविले. या प्रकरणी अजित पिलणकर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

बुडालेल्या नेपाळी
खलाशाचा मृत्यू
रत्नागिरी ः मद्यपान करून बोटीवरून निघून गेलेला खलाशी मिरकरवाडा जेटी येथे समुद्राच्या पाण्यात तरंगताना आढळला. उपचारासाठी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. समित तेजराम चौधरी (वय २१, रा. मंगरागाव, जि. कैलाली. सध्या रा. मिरकरवाडा जेटी-रत्नागिरी) असे मृत खलाशाचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. ३) दुपारी एकच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चौधरी हा वैभवी खेडेकर यांच्या मीनाक्षी बोटीवर काम करत होता. तो गावी जाणार आहे, असे बोलत होता. त्याबाबत त्यांच्या वडिलांनाही कळविले होते. वडिलांनी नेपाळला पोहोचला की कळवतो, असेही सांगितले होते; मात्र सोमवारी समित याने मद्यपान करून बोटीवरून निघून गेला होता. त्याचा शोध घेतला असता तो मिरकरवाडा जेटी-क्र. १ येथे समुद्राच्या पाण्यात तरंगताना आढळला. तत्काळ त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

डंपरच्या धडकेत
पादचारी गंभीर
रत्नागिरी ः तालुक्यातील पानवल रस्त्यावर डंपरच्या धडकेने पादचारी गंभीर जखमी झाला. त्याला बेशुद्धावस्थेत जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. सोनू रामलाल हलवारी (वय ३२, रा. खेडशी, रत्नागिरी, मूळ ः बिहार) असे गंभीर जखमी तरुणाचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता. ४) दुपारी बाराच्या सुमारास पानवल-चाँदसूर्या रस्त्यावर घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पानवल येथे रस्त्यावर डंपरने पादचारी तरुणाला धडक दिली. या अपघातात पादचाऱ्याच्या डावा पायाला गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. त्याच्यावर उपचार सुरू असून, तो बेशुद्ध आहे. या प्रकरणी जिल्हा रुग्णालयाच्या पोलिस चौकीत अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

एसटीतील प्रवासी जखमी
रत्नागिरी ः एसटी चालकाने बसला ब्रेक लावल्याने प्रवासी तरुणी बसमध्येच जखमी झाली. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रोहिणी जयराम जाधव (वय २३, रा. खडीकोळवण, ता. संगमेश्वर) असे जखमी तरुणीचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता. ४) सकाळी सव्वाअकराच्या सुमारास दाभोळे येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जखमी रोहिणी जाधव या कोल्हापूर-गणपतीपुळे या एसटी बसने साखरपा ते पाली अशा येत असताना दाभोळे रस्त्यावर एसटी चालकाने अचानक ब्रेक लावला. त्यामुळे बसमध्ये उभ्या असलेल्या जाधव हिच्या डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी तिला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. या प्रकरणी जिल्हा रुग्णालयाच्या पोलिसचौकीत नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

Akola Drought : अकोल्यात खारपाणपट्ट्यात सप्टेंबरअखेरच दुष्काळाची दाहकता! महिनाभरातून एकदा नळाला पाणी; टाक्यांमध्ये साठवलेले पाणी आरोग्यास घातक

Mumbai News: हॉटेलमध्ये डोशात मृत उंदीर सापडला; ग्राहकाला उलट्या; मुंबईतील किळसवाणा प्रकार!

Marathi News Live Updates: दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार बंब यांचे आश्वासन

SCROLL FOR NEXT