गंगाराम गवाणकरांमुळे जगभरात मालवणीचा बोलबाला
विजय शेट्टी : गोपुरी आश्रमात मान्यवरांची आदरांजली
कणकवली, ता.५ : वस्त्रहरण नाटकाच्या माध्यमातून गंगाराम गवाणकर यांनी मालवणी भाषा सातासमुद्रापार नेली. या नाटकाचे आजपर्यंत ५००० हजारांहून अधिक प्रयोग झाले आहेत. गवाणकर यांच्या वस्त्रहरण नाटकामुळे जगभरात मालवणी भाषेचा बोलबाला आहे, हा बोलबाला टिकून ठेवणे हीच खरी वस्त्रहरणकार गंगाराम गवाणकर यांना खरी श्रद्धांजली ठरेल असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक विजय शेट्टी यांनी येथे केले.
कोकण मराठी साहित्य परिषदेच्या कणकवली शाखा आणि गोपुरी आश्रमाच्यावतीने वस्त्रहरणकार गंगाराम गवणाकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमात श्री.शेट्टी बोलत होते. यावेळी कोमसपच्या कणकवली शाखेचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार माधव कदम, कार्यवाह निलेश ठाकूर, राजेश रेगे, रिमा भोसले, राजन भोसले, संदीप सावंत, सिद्धेश खटावकर, उमेश जाधव, सदाशिव राणे आदी उपस्थित होते.
राजस रेगे म्हणाले, वहस्त्रहरण नाटकाद्वारे जगभरात मालवणी भाषेचा बोलबाला निर्माण केला. हा बोलबाला टिकून ठेवणे ही त्यांना खरी आदरांजली ठरेल. मालवणी माणसांनी मालवणाची भाषेचा जगभर प्रचार व प्रसार करून मालवणीचा भाषेचा झेंडा फडकवत ठेवावा,
रिमा भोसले यांनी नानांच्या आठवणींना उजाळा दिला. सिद्धेश खटावकर यांनी नानांसोबत काम करताना आलेले अनुभव शेअर केले. त्यांच्या साहित्यात तरुणपणात होता. त्यामुळे त्यांचे साहित्य वाचल्यानंतर तरुण पिढीला नवी उमेद मिळते, अशी भावना खटावकर यांनी व्यक्त केली. आरंभी मान्यवरांनी गंगाराम गावणकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. सूत्रसंचालन व आभार सिद्धेश खटावकर यांनी केले.
कोट
वस्त्रहरण नाटकाद्वारे गंगाराम गवाणकर व मच्छींद्र कांबळी यांनी मालवणी भाषेचा जगभर प्रचार व प्रसार करून या भाषेविषयी प्रत्येकाचा मनात आवड निर्माण काम केले. साहित्य व नाट्य क्षेत्रात गंगाराम गवाणकर यांचे मोलाचे योगदान आहे. साहित्य व नाट्य क्षेत्रात त्यांनी उत्तुंग उंची गाठली तरी त्यांचा स्वभाव निरागस, खोडकर, मनाचा मोठेपणा दाखवणारा होता. आयुष्यात त्यांनी संघर्ष केला. त्यांनी आपले आयुष्य साधेपणाने जगले. त्यांचा साधेपणा सर्वांना भावत होता. नाना यांच्या जाण्याचे साहित्य, नाट्य क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.
- माधव कदम
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.