फोटो : kan53.jpg
02525
वागदे : येथील गोपुरी आश्रमात अप्पासाहेब पटवर्धन यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी आश्रमाचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र मुंबरकर व इतर मान्यवर उपस्थित होते.
जाती, धर्माच्या विद्वेषाला मानवतेने उत्तर द्या
राजेंद्र मुंबरकर : गोपुरी आश्रमात आप्पासाहेब पटवर्धन जयंती साजरी
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. ५ : सध्या देशात जाती, धर्माच्या विद्वेषाचे वातावरण आहे. हे वातावरण बदलण्यासाठी माणुसकी, मानवतेचे वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे. ही वातावरण तयार करण्याची सर्वांत मोठी जबाबदारी तरुण पिढीची असून जातीय आणि धार्मिक विद्वेषाला मानवतावादाने उत्तर द्या, असे आवाहन डॉ. राजेंद्र मुंबरकर यांनी केले.
कोकणचे गांधी आप्पासाहेब पटवर्धन यांच्या जयंती गोपुरी आश्रमात साजरी करण्यात आली. याप्रसंगी आश्रमाचे अध्यक्ष डॉ. मुंबरकर बोलत होते. यावेळी गोपुरी आश्रमाचे संचालक युयुत्स आर्ते, अर्पिता मुंबरकर, विनायक सापळे, संदीप सावंत, अमोल भोगले, सदाशिव राणे, राजेंद्र कदम, जयवंत वाईरकर, प्रवीण गुरव, प्रतीक गोसावी, भाविक गोसावी, पुंडलिक कदम, प्रकाश आरोलकर, बाळकृष्ण सावंत, संदीप साटम, किशोर गुरव आदी उपस्थित होते.
श्री. मुंबरकर म्हणाले, गोपुरी आश्रमाच्या माध्यमातून आप्पासाहेब पटवर्धन यांच्या कार्याचा व कामाचा वारसा पुढे नेला जात आहे. गोपुरी आश्रमाच्या कामाबद्दल सर्वांना आस्था आहेत. मात्र, आश्रमाचे प्रत्यक्ष काम करण्यासाठी कोणीही पुढे येत नाही. आप्पासाहेब पटवर्धन यांच्या कार्याचा विसर कॉंग्रेस पक्षासह कोकणवासीयांना पडला आहे. माणसाला माणूस म्हणून घडविण्याचे काम गोपुरी आश्रमाच्या माध्यमातून केले जात आहे. या कामात समाजातील सर्व घटकांनी सहभागी व्हावे.
युयुत्स आर्ते यांनी आप्पासाहेब पटवर्धन यांच्या आठवणींना उजाळा दिला. आरंभी मान्यवरांनी आप्पासाहेब पटवर्धन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. सूत्रसंचालन अमोल भोगले तर आभार सदाशिव राणे यांनी मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.