- rat५p७.jpg-
P२५O०२५४८
पावस ः तालुक्यातील गणेशगुळे येथे वासुदेव बळवंत फडके यांच्या जन्मदिनानिमित्त जयजयकार कार्यक्रम करण्यात आला त्या प्रसंगी उपस्थित मान्यवर.
---
‘जयजयकार’ कार्यक्रमातून
फडके यांची स्मृती उजाळली
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. ५ ः आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या १४०व्या जन्मदिनाचे औचित्य साधून रत्नागिरी तालुक्यातील गणेशगुळे येथील फडकेवाडीत राष्ट्रसेविका समिती आणि रेणुका प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जयजयकार’ कार्यक्रम झाला. फडके यांच्या मूळ गावी गणेशगुळे येथे हा कार्यक्रम झाला.
राष्ट्रसेविका समितीच्या कोकण प्रांत समिती प्रचारक वैशाली भागवत या उपस्थित होत्या. त्या इंजिनिअर असून, नोकरीचा त्याग करून गेली सात वर्षे प्रचारिका म्हणून समितीचे कार्य निष्ठेने करत आहेत. या वेळी अपूर्वा मराठे आणि सरिता सोलकर या प्रमुख कार्यकर्त्यांही उपस्थित होत्या. आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांनी ब्रिटिश सत्तेविरूद्ध सर्वप्रथम सशस्त्र क्रांतीचा मार्ग स्वीकारला होता आणि त्यांना ‘भारतीय सशस्त्र बंडाचे जनक’ म्हणून ओळखले जाते. त्यांच्या मूळ गावी समितीच्यावतीने आयोजित या ‘जयजयकार’ कार्यक्रमातून त्यांच्या कार्याला आदरांजली वाहण्यात आली आणि उपस्थित महिला व नागरिकांना राष्ट्रसेवेची प्रेरणा मिळाली.
---