rat५p१.jpg-
P२५O०२५१७
रत्नागिरी : नाचणे ग्रामपंचायतीच्या वर्धापनदिन सोहळ्यात सत्कार करताना सरपंच ऋषिकेश भोंगले व मान्यवर.
नाचणे ग्रामपंचायतीत विकासाचा उत्सव
वर्धापनदिनानिमित्त महिला बचतगटांचे कार्यक्रम ; उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा गौरव
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ५ : नाचणे ग्रामपंचायतीच्या ६६व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रम राबवण्यात आले. राज्यशासनाने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत गावांमध्ये करावयाच्या सात उद्दिष्टांचा आधार घेऊन गावांतील महिला बचतगट यांना प्रोत्साहित करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे घेण्यात आले.
महिला, अंगणवाडी सेविका, आशासेविका, अंगणवाडीतील मुले, ग्रामस्थांना एकत्र करून ओम साई मित्रमंडळ सभागृहात मिश्रडाळींपासून पदार्थ बनवण्याची पाककला स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि गुणगौरव कार्यक्रम झाला. तेरेदेसाई यांनी परीक्षण केले. १०वी, १२वीमधील ८५ टक्क्यांच्या वर गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि विविध खेळांमध्ये यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले. नाचणे गावात कांदळवन बचतगटामार्फत कयाकिंग व खाडीसफारीचा उद्योग करणाऱ्या बचतगटाला राज्यस्तरीय प्रथम पारितोषिक प्राप्त झाले आहे. इतर बचत गटाचादेखील सत्कार करण्यात आला. रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, स्वच्छता कार्यक्रम, मुलांमधील कलागुण जोपासण्यासाठी विविध शिबिराचे आयोजन करणाऱ्या गावातील मंडळांचाही सन्मान करण्यात आला.
गावातील ज्येष्ठ नागरिक एकत्रित येण्यासाठी ग्रामपंचायतीमार्फत ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे तसेच त्यांनी ज्येष्ठ नागरिक संघाची स्थापना केली आहे. त्या संघामार्फत गावांतील ज्येष्ठ नागरिकांच्या अडीअडचणी, त्यांच्या आरोग्याची काळजी, विरंगुळा, वार्षिक सहली कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. त्यांचा आणि महिला भजन मंडळांचा सत्कार करण्यात आला. कौशल्य विकास योजनेअंतर्गत ग्राफिक डिझायनर कोर्स पूर्ण करणाऱ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवले. या कार्यक्रमाला सरपंच ऋषिकेश भोंगले, उपसरपंच निलेखा नाईक, ग्रामपंचायत सदस्य सुचिता घडशी, सिद्धी सुपल, प्रीती रसाळ, विभावरी नागवेकर, शिवानी रेमुळकर, रेश्मा कोळंबेकर, शुभम सावंत, विनेश गार्डी तसेच ग्रामपंचायत अधिकारी गणपत खरंबळे व कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
-----
चौकट १
अनुष्का यादव पैठणीच्या विजेत्या
ओम साई मित्रमंडळाच्या हॉलमध्ये खेळ पैठणीचा सन्मान महिलांचा या कार्यक्रमाला १०८ महिलांचा उदंड प्रतिसाद लाभला. यात पहिला क्रमांक अनुष्का यादव, द्वितीय ऊर्मिला यादव आणि तिसरा क्रमांक स्वप्नजा भोरे यांनी पटकावला. त्यांना पैठणी साडीचा पुरस्कार देण्यात आला. सूत्रसंचालन तन्वी सावंतदेसाई हिने केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.