कोकण

भातासाठी शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल २,३७९ रुपये दर निश्चित

CD

भाताच्या दरात केवळ ७९ रुपयांची वाढ
प्रतिक्विंटल २ हजार ३७९ रुपये दर निश्चित ; ऑनलाईन नोंदणी आवश्यक, उत्पादनात घट
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ५ ः शासनाने भाताला हमीभाव जाहीर केला असून, प्रतिक्विंटल २ हजार ३७९ रुपये दर निश्चित झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत ७९ रुपयांची वाढ करण्यात आली आहे; मात्र, भातविक्री करण्यासाठी शासन नियमानुसार शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. यंदा पाऊस पडल्यामुळे उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. याचा फटका भातविक्रीलाही बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
जिल्ह्यात मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडील भाताची एकूण १४ केंद्रांवर भातखरेदी करण्यात येते. दरवर्षी ऑक्टोबरपासून ऑनलाइन नोंदणी शेतकऱ्यांना करावी लागते; मात्र यावर्षी अद्याप ऑनलाइन नोंदणीविषयक कोणतीही सूचना शासनाने जाहीर केलेली नाही; परंतु सूचना प्राप्त होताच ऑनलाइन नोंदणीसाठी शेतकऱ्यांना अवधी देण्यात येणार आहे. दिलेल्या अवधीत शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी करणे क्रमप्राप्त आहे. नोंदणी न करणाऱ्या शेतकऱ्यांना भातविक्री करता येणार नाही. नोंदणीबाबत लवकरच यावर सूचना केली जाणार आहे.
ऑनलाइन नोंदणी करताना शेतकऱ्यांचे आधारकार्ड, पिकक्षेत्राचा सातबारा, आठ अ, बॅंक पासबुकची झेरॉक्स जोडणे क्रमप्राप्त आहे. ऑनलाईन नोंदणी करताना शेतकऱ्यांचा बॅंकेच्या खात्याचा क्रमांक घेतला जात असल्याने विक्रीनंतर रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होते; मात्र भातासाठी शासनाने गतवर्षी प्रतिक्विंटल २ हजार ३०० रुपये दर दिला होता. यावर्षी २ हजार ३७९ रुपये दर जाहीर केला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी अवघे ७९ रुपये वाढवले आहेत. दरामुळे शेतकरी मात्र नाराज झाले आहेत.
दरम्यान, गेल्या काही वर्षात फेडरेशनकडे भात देण्याचे प्रमाण हळूहळू वाढत आहे. अनेक शेतकरी घरगुती वापरासाठी भात ठेवून उर्वरित फेडरेशनकडे देत आहेत. त्यामधून मजुरीसह उर्वरित खर्च वळता करता येतो. मजुरीचे दर वाढल्याने शेती आतबट्ट्याची झालेली आहे. त्यामधून मार्ग काढण्यासाठी कमी जागेत अधिक उत्पादन घेतले जाते. हेक्टरी ३२ क्विंटल भात उत्पादन मिळत असल्याने शेतकऱ्याला थोडा लाभही मिळू लागला आहे.

चौकट
खरेदी-विक्रीत तांत्रिक समस्या
भातविक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणी करावी लागते; मात्र जिल्ह्यात नेटवर्क समस्या असल्याने ऑनलाइन नोंदणीत अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच पुरेसा अवधी मिळत नसल्याने अनेक शेतकरी यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd T20I: वेस्ट इंडिजला आली लहर, केला कहर! भारताचे २५० धावांचे विक्रमी लक्ष्य सहज पार केले, शे होपचे नाबाद शतक

Beed News : विद्यार्थी खरेदी-विक्रीतून बोगस संचमान्येचा महाघोटाळा; चंपावती विद्यालयात आढळले उत्तराखंडचे ३ बोगस विद्यार्थी

Ganja Farm Seized : गाढेजळगाव शिवारात गांजाची शेती उघड; ४३० झाडे जप्त, १८ लाख १९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल, शेतकरी आरोपीला अटक

IND vs WI 2nd T20I: W,W,W! ज्याने आस दाखवली, त्यानेच माती खाल्ली; Mayank Yadav च्या चूकीने मॅच गेल्यात जमा, नेमकं काय घडलं?

Delhi Protest: 30 हजार जवान तैनात अन् 200 जण ताब्यात; CJPच्या आंदोलनापूर्वी दिल्लीत काय-काय घडतंय?

SCROLL FOR NEXT