- rat६p६.jpg-
२५O०२७३३
अश्विनी मोरे
---
अहिल्यादेवी होळकर पुरस्कार
अश्विनी मोरे यांना जाहीर
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ६ ः महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत महिला व बालकल्याण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या समाजसेविका पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार अश्विनी मोरे यांना जाहीर झाला आहे. सामाजिक क्षेत्र तसेच विविध स्तरावरून त्यांचे कौतुक होत आहे.
पहिली-दुसरीत शिक्षण घेत असल्यापासून अश्विनी या उत्तम गाणी गाऊन भाकर या संस्थेच्या उभारणीसाठी मदत करत होत्या. त्यांनी संस्थेच्या स्वयंसेवकांच्या जेवणासाठीचा खर्च कमी करण्यासाठी मदत केली तसेच संस्थेच्या प्रत्येक कार्यात हिरिरीने भाग घेऊ लागल्या. समाजसेवेचा आईचा वारसा चालवण्याचा ध्यास त्यांनी मनात ठेवून संस्थेच्या कामकाजाला गती दिली. संस्थेच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणासाठी १५ पदयात्रा काढल्या. महिला बचतगट, माता व बालसंगोपन, गुजरात भूकंप, दुष्काळामधील चारा छावणी, चिपळूण पूर, कोविड काळात मदत तसेच महिलांचे ३५ हून जास्त महिला मेळावे त्यांनी घेतले.